डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या कामाला निधी देऊन गती आणणार : अण्णा बनसोडे…

संविधान दिनानिमित्त
सभेचे आयोजन
================
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या कामाला निधी देऊन कामाला गती आणणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी दिले. प्रभाग क्रमांक १ मध्ये संविधान दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत गुरुवारी सायंकाळी सहसंपर्क मंत्री बनसोडे बोलत होते.

आचारसंहिता संपताच रोजंदारी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी १० डिसेंबरला बैठक लावणार आहे. त्यामुळे आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून दिल्यास प्रभागाच्या समस्या सोडविण्याला आणखी बळ मिळेल, असेही अण्णा बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले.

या सभेमध्ये ठाकरे सेनेच्या सरोजिनी मकाई आणि युवक काँग्रेसचे राजन निकाळजे यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुजित अवघडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर,चित्रा कदम,सेवादलाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, तुषार जक्का यांच्यासह सुरेश कांबळे,राजेश निकाळजे, रोहित गायकवाड, पराग कुमठेकर, विजयानंद काळे, हार्दिक सरवदे, संचित कांबळे, आनंद इंगळे, संबोध मोरे,आशिष कदम, विश्वनाथ वाघमारे, अश्वदीप जानराव,राहुल कुचेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




