प्रभाग क्र. २२ मध्ये टाकारी समाजासाठी सांस्कृतिक हक्काचे स्वप्न साकार…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून ५० लाखांचे सांस्कृतिक भवन नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या भरीव प्रयत्नांना यश

सोलापूर –
प्रभाग क्रमांक २२ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत टकारी समाजासाठी उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साही व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रभाग क्र. २२ चे लोकप्रिय नगरसेवक किसन जाधव आणि सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या अथक व विशेष प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी विकासप्रकल्प साकार झाला आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विकास निधीतून ५० लाख रुपयांचा भरीव निधी या सांस्कृतिक भवनासाठी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे टाकारी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याप्रसंगी टाकारी समाजाच्या वतीने नगरसेवक किसन जाधव व नगरसेवक नागेश गायकवाड यांचा शाल व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजबांधवांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी समाजाचे जेष्ठ टकारी समाजाचे अध्यक्ष गैबू (काका)जाधव, डॉक्टर सायबु गायकवाड, युवक अध्यक्ष विनोद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे आभार मानले तसेच टकारी समाजातील राष्ट्रीय खेळाडू अंबादास गायकवाड यांची कबड्डी राष्ट्रीय प्रशिक्षक (कोच) पदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक किसन जाधव यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. टकारी समाज हा परिश्रम, एकजूट आणि स्वाभिमान जपणारा समाज म्हणून ओळखला जातो.

समाजाची सांस्कृतिक ओळख जपली जावी, युवकांना दिशा मिळावी आणि पुढील पिढीला संस्कारांचे केंद्र उपलब्ध व्हावे, या भावनेतूनच किसन जाधव व नागेश गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला, अशी भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यास टाकारी समाजातील ज्येष्ठ व मार्गदर्शक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गैबु (काका)जाधव डॉ. साहेबराव गायकवाड, बसु मामा गायकवाड, शिवाजी जाधव, सुनील जाधव, विद्यासागर (पिंटु)जाधव, तुकाराम मामा जाधव, भारत जाधव, सायबु गायकवाड सुहास सर राजु जाधव दिपक (सरपंच)जाधव यांच्यासह समाजाचे आधारस्तंभ सहभागी झाले होते. युवकांचे नेतृत्व करत टाकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव, तसेच सचिन अक्षय जाधव, सूर्यकांत मामा गायकवाड, राजाराम जाधव, सचिन जाधव, अंबादास गायकवाड, सुहास सर जाधव निखिल हैसनुर आदी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महिला भगिनींची उपस्थितीही उल्लेखनीय ठरली.

पारुबाई जाधव प्रयगाबाई गायकवाड, इंदुताई गायकवाड, पुनमताई गायकवाड, राजश्रीताई जाधव, नेहा(डॅाली)जाधव महादेवीताई जाधव, कमळाताई जाधव, रेखाताई गायकवाड, शांताताई गायकवाड, भिमताई गायकवाड यांच्यासह माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित समाजबांधवांनी किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या समाजाभिमुख, विकासनिष्ठ नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. समाजाच्या गरजा समजून घेणारे, निधी आणणारे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
टकारी समाजासाठी हे सांस्कृतिक भवन म्हणजे केवळ इमारत नसून, एकतेचे, स्वाभिमानाचे आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचे केंद्र ठरणार आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. एकूणच, हा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक बांधिलकीचा, विकासाभिमुख राजकारणाचा आणि किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या समाजनिष्ठ नेतृत्वाचा ठसा उमटवणारा ठरला.



