स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या यंदाच्या वर्षातील दुसऱ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध….

सोलापूर
स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील श्री वीरतपस्वी सांस्कृतिक भवनात रविवारी झाला. सायंकाळी ६ वाजून ५१ मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात धर्मगुरूंचे आशीर्वचन नवविवाहित जोडप्यांना लाभले. यंदाच्या वर्षातील हा दुसरा विवाह सोहळा होता.

जोडप्यांना स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे पलंग, गादी, कपाट, संसारोपयोगी भांडी, साहित्य, वधूस शालू मणी, मंगळसूत्र, जोडवे तर वरास सफारी कपडे, बूट देण्यात आले.
स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, श्री ष ब्र १०८ श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी (नागणसुर), श्रेष्ठी ब्रह्मनिष्ठ परमपूज्य श्री परमानंद अप्पाजी विजयपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, मा. आमदार प्रशांतराव परिचारक, नरसिंग मेंगजी, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्वस्तिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, अतिरिक्त आयुक्त मनपा संदीप कारंजे, मा. शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मा. नगरसेवक संजय कोळी, चंद्रकांत वानकर, पुरुषोत्तम बरडे, नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष पवार, मा. नगरसेवक अमोल शिंदे, राजकुमार पाटील, राजशेखर हिरेहब्बू, सिद्धय्या हिरेमठ स्वामी, आनंद चंदनशिवे, अशोक संकलेचा, रंगनाथ बंकापूरे, राजेंद्र काटवे, इंद्रमल जैन, प्रकाश वाले, बाळासाहेब शेळके, श्रीशैल हत्तुरे, सोमनाथ भोगडे, सुरेश फलमारी, श्रीशैल नरोळे, सुधीर थोबडे, राजन जाधव, पापाशेठ दायमा, राजू राठी, गिरीधर भुतडा, व्यंकटेश चाटला, प्रमोद मोरे, शिवानंद मेंडके, नरेंद्र गंभीरे, शांतप्पा स्वामी, वैभव बरबडे, प्रताप चव्हाण, राजेंद्र गड्डम पंतुलु, इंदिरा कुडक्याल, मल्लिकार्जुन मारता, राम जाधव आदींसह सोलापूर शहरांतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह स्वस्तिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. किरण देशमुख यांनी सर्व मान्यवर व वऱ्हाडीचे आत्मीयतेने स्वागत केले. पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. आमदार विजय देशमुख यांनी प्रास्ताविक तर डॉ. किरण देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

———–
चौकट १
गुलाब जामुन आणि मसाला पुरीचा खास बेत
सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी गुलाब जामून, वांगी मसाला, पालक गरगट्टा, चपाती, मसाला पुरी, जीरा राईस, पापड, फ्रुट सॅलड असा खास बेत होता.
——–
चौकट २
वंदे मातरम ने वेधले सोलापूरकरांचे लक्ष
वंदे मातरम गीताला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी अर्थात १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वंदे मातरम चा संदेश देणारा फलक लावण्यात आला होता. या फलकावर हाती तिरंगा ध्वज असणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी होती.




