गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटी नंतर सांगवी {खुर्द},सांगवी {बुद्रुक}, व शिरसी येथील बाधित कुटुंब ,महसूल प्रशासनाचे अधिकारी – कर्मचारी, पोलिस यांच्यासह वाहन चालकांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने फूडचे पाकीट वाटप…

सोलापूर
नैसर्गिक आपत्तीच्या काळात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ नेहमीच धावून जाते .संस्थेचे अध्यक्ष जनमेजयराजे भोसले ,कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले हे प्रशासनच्या व नागरिकांच्या मदतीला धावून जात असतात.गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अक्कलकोट येथील ढगफुटी नंतर अक्कलकोट मधील अनेक गावांचा संपर्क तुटला. यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सूत्रे वेगाने फिरली. व अक्कलकोट मधील सांगवी { खुर्द } , सांगवी { बुद्रुक} व शिरसी येथील बाधित कुटुंबीयांसह तेथे शासकीय सेवेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपथित असलेले महसूल प्रशासनाचे कर्मचारी ,पोलिस बांधव यांना संकटांच्या भीषण परिस्थितीत फूड पाकीट वाटप करण्यात आले.

दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या वाहनातून सदरचे फूड पाकीट हे तयार करून सांगवी (खु), सांगवी(बु) व शिरसी येथील बाधित कुटुंबियांपर्यंत पोहचविण्यात आले. न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते या गावातून डोअर टू डोअर जाऊन फूड पाकीट देण्यात आले. अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपसण्याचे काम याही वेळेस केले आहे. यापूर्वी दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी राज्यासह परराज्यात आपत्तीच्या वेळी मदतीला धावून गेले आहेत.

चौकट :
सदैव तत्पर:
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच न्यास हे नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय यंत्रणेच्या व नागरिकांच्या मदतीला धावून जाते. आजही अन्नछत्र मंडळ हे त्वरित आम्हा ग्रामस्थांना मदत करून मोठा दिलासा दिला आहे.

*पंचप्पा लवटे,ग्रामस्थ सांगवी(खु)*
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, अंकुश घाडगे, प्रवीण घाडगे, सिद्धाराम कल्याणी, अतिश पवार, महादेव अनगले, रोहन शिर्के, प्रदीप सलबत्ते, रोहित गाडगे, राम माने, बलभीम पवार, फरहान पटेल, गावकामगार तलाठी लक्ष्मण शिंदे, महसूल सेवक जाकीर कागदे, बबन पवार, अप्पा बंडगर, कल्याणी डीग्गे,गुणवंत लवटे, हणमंत घोडके, अशोक गुरव, रुकुम इट्गी, अक्षय घाडगे, ओंकार घाडगे, लक्ष्मण गायकवाड, शरद घाडगे, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, तुकाराम माने, कुमार सलबत्ते, चंद्रकांत हिबारे, श्रीशैल माळी, शहाजी यादव, खंडेराव होटकर, शिव काळे, रोहित कदम, ज्ञानेश्वर भोसले, शरद भोसले, नाम भोसले, आदीजणासह न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी व अमोलराजे भोसले मित्र परिवार उपस्थित होते.

चौकट:
अन्नछत्र मंडळाच्या अग्निशामक वाहनामुळे जीवित हानी टळली:
गुरुवारी मध्यरात्री अक्कलकोट ते सोलापूर रस्त्यावरील कर्जाळ येथे कर्नाटकाहून सोलापूर ला जाणाऱ्या इनोव्हा कारला अचानक लागलेल्या आगी मुळे एकच भडका उडालेला होता. या प्रसंगी विश्वनाथ मोटगी या न्यासाच्या सेवेकाऱ्याला भ्रमणध्वनी वरून सदरची माहिती मिळताच त्याने लगेच सेवेकरी विजय तथा गोटू माने यांना सदरची माहिती कळवताच त्यांनी तात्काळ अग्निशामक वाहनाचे चालक सुरज कदम यांना संपर्क साधून वाहन पाठवून देण्यात आल्याने उडालेला भडका त्वरित शांत केल्याने जीवित हानी टळली आहे.



