crimemaharashtrapoliticalsocialsolapur

राजकीय दबाव तंत्राचा वापर करत भाजप शहराध्यक्षांकडून खोटे आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल…

 

सोलापूरः

सोलापुरातील सुमारे १२५ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेली सरस्वती मंदीर प्रशाला, या संस्थेतून अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, थोर सहित्यिक IPS, IAS , उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ असे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या पदावर कार्यरत असून अशी संस्थेची ओळख आहे. या संस्थेचे विधी क्षेत्रातील नामांकित वकिल व विद्यमान अध्यक्ष ॲड पांडूरंग देशमुख तसेच सामाजिक, सांस्कृतीक कार्यात कर्तृत्व कुशल संघटक , विचारवंत अभ्यासक मुकबधीर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका तसेच भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान अध्यक्षा, तसेच श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या विद्यमान कार्यवाह रोहिणी तडवळकर यांनी पोलीस आयुक्त सोलापूर यांना १७/८/२०२५ रोजी
अनिरुद्ध देशपांडे व पत्रकार रवींद्र नाशिककर यांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज केला होता.त्यात देशपांडे व नाशिककर
हे संस्थेची चुकीचे व असंदर्भीय अर्ज करून तसेच व्हॉटशॉप ग्रुप द्वारे बदनामी करत असून, सरकारी कार्यालयात चुकीच्या व वारंवार तक्रारी करून पत्रकार असल्याचे सांगून दबाव आणण्यास प्रतिबंध करून त्यांनी केलेल्या गैरकृत्याची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी तक्रार संस्थेच्या लेटरपॅटवरून केली होती .

 

 

तो तक्रारी अर्ज फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चौकशी साठी दिनांक १८/८/२०२५ रोजी वर्ग करण्यात आला .त्यानुसार फौजदार चावडी पोलीसांनी नाशिककर व देशपांडे यांना बोलावले या संपूर्ण प्रकरणांची सखोल चौकशी केली .या चौकशीत देशपांडे व नाशिककर यांना क्लिनचीट मिळाली.
तक्रारीतील मचकूर खोटा व दिशाभूल करणारा असून पोलिसांकडून नाहक त्रास व्हावा, या सुडबुद्धीने पुर्वग्रह दूषित हा तक्रारी अर्ज दिल्याची संतापजनक प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार रवींद्र नाशिककर यांनी संघर्ष योद्धा वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली .दि १२/८/२०२५ रोजी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे वास्तविक पहाता जबाबदार संचालकांनी कायदेशीर रितसर पुरातत्व खात्याची परवानगी घेणे गरजेचे असताना बेकायदेशीर पणे बांधकाम करून विद्यार्थीच्या जिवाला धोका निर्माण केला.

 

 

 

असे स्वीकृत दर्शनी दिसते. पुरातत्व खात्याने पुरातत्व स्थळे, आणि अवशेष कायदा १९५८ तसेच पुरातत्व कायदा अधिनियम २०१० द्वारे हे कायदे लागू असून केलेले बांधकाम सात दिवसात पाडून टाकण्यात यावे या संदर्भात २६/४/२०२२ व २७/४/२०२२ रोजी बजावण्यात आली होती .त्यानंतर पुन्हा एक नोटीस दिनांक १८/७/२२ रोजी केलेले बांधकाम बेकायदेशीर व अनाधिकृत असल्याचे पुरातत्व विभागाने ठरवून संस्थेचे तात्कालीन पदाधिकारी ॲड रघूनाथ दामले, ॲड पांडूरंग देशमुख, किरण करकमकर, शिरीष तुळजापूरकर या चौघांना जबाबदार ठरविण्यात आले. या संदभातील स्थानिक लोकल चॅनल संपादक न्यूज एक्सप्रेस तसेच संघर्ष योद्धा यांनी या घटनेचा पर्दाफाश करत एक प्रकारचे बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम करून संस्थेला करोडो रुपयाचा दिवसाढवळ्या चूना लावण्याचे कट कारस्थान संस्थेच्या जबाबदार संचालकांनी केल्याचे उघडकीस आणले होते. यासंदर्भात मे. नवले यांच्या कोर्टात केस नंबर ७९४/२०२५ या केस मध्ये तात्कालीन अध्यक्ष ॲड रघूनाथ दामले ॲड पांडूरंग देशमुख तात्कालीन खजिनदार किरण करकमकर तात्कालीन उपाध्यक्ष शिरीष तुळजापूरकर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर श्रीनिवास मोहोळकर यांच्यावर बेकायदेशीर बांधकामावरून संस्थेची आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हामध्ये केस दाखल केली.

 

 

 

या संदर्भात २० ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले असे विश्वासनीय वृत आहे. बेकायदेशीर बांधकाम करत विद्यार्थाच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या पदाधिकारी पदाचा गैरवापर करत शासकीय यंत्रणेवर दबाव टाकत संस्थेच्या सभासदांविरोधात निखालास धांदात खोट्या तक्रारी करून फार मोठ्या फुशारकी मारण्यात व पोलिसांच्या चौकशी फेऱ्यात अडकवण्याचा केविलवाणा प्रयन्त असफल ठरवत स्वत: च्या अकलेचे तारे तोडण्यात अयशस्वी झाले. सरस्वती मंदीर प्रशालेची नाहक बदनामी हे जबाबदार पदाधिकारी “हम करे सो कायदा” धाब्यावर ठेवून विनाकारण करत असून तेव्हा “तो मी नव्हेच” या थाटामाटात वावरणारे व स्वत:च्या अकलेचे तारे तोडणारे विश्वास घातकी व नैतिक अधिकार गमावलेल्या संचालकांनी सरस्वती मंदिरची नाहक बदनामी थांबवून राजीनामा घ्यावा अशी मागणी संस्थेतील ज्येष्ठ विचारवंत विधितज्ञ , डॉक्टर, माजी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर, विद्यमान सभासदांमधून राजीनाम्याची मागणी होत असून संपूर्ण शिक्षण क्षेत्रात या विषयाची चर्चा होत असून हे निष्कीय कार्यकारी मंडळ काय निर्णय घेणार? या कडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button