maharashtrapoliticalsocialsolapur

श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात २८ व २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

.a

सोलापूर : प्रतिनिधी

श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिररात गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टी उदय वैद्य यांनी दिली.

गुरु पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पालखी प्रदक्षिणा मंगळवार, दि. २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता मंदिर परिसरात संपन्न होणार आहे. बुधवार, दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या पवित्र शुभमुहूर्तावर ज्या भाविकांना गुरु करून नामसाधना घ्यावयाची आहे, त्यांच्यासाठी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

गुरु पौर्णिमेनिमित्त दि. २३ जुलैपासून श्रीमती मीनाताई जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री गुरुगीता सप्ताहाची बुधवारी सांगता होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता वाजता महाआरती संपन्न होईल. यानंतर दुपारी १२.३० ते सायंकाळी ४ या वेळेत श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या जीवनावर सुमारे २५ वर्षांपूर्वी निर्मित झालेल्या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी चित्रपट निर्मितीत सहभागी झालेल्या कलाकारांचा मंदिर समितीच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे.

 

 

 

सायंकाळी ४.३० वाजता मुख्य श्री गुरु पादुकांचा अभिषेक व श्री गुरु पूजन विधिवत संपन्न होईल. त्यानंतर नियमित भजनाचा कार्यक्रम होईल.
रात्री ८ वाजता मंदिराची प्रसिद्ध परंपरा असलेला आमटी-भात महाप्रसाद सर्व भाविकांना देण्यात येणार आहे.

गुरु पौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वाचा आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button