ईच्छा भगवंताची परिवाराच्या ‘भाऊ चषका’चा दिमाखदार समारोप; आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
युवकांना क्रीडा क्षेत्रात मोठी संधी; अशा स्पर्धांमधून राज्याला दर्जेदार क्रिकेटपटू घडतील – आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी

SP 11 विजेता, KK राजहंस (उळे) उपविजेता, KK राजा तृतीय; विजेत्यांना रोख पारितोषिकांसह चषक प्रदान
सोलापूर :
ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थांकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी (भाऊ ) फडणवीस साहेब तसेच सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्र. २२ चे भाजपा नगरसेवक किसन (भाऊ) जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजापूर रोड येथील शासकीय क्रीडांगणावर २२ ते २५ जुलैदरम्यान आयोजित ‘भाऊ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व शहर मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली, माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड, कार्तिक भैय्या जाधव, अजिंक्य अनिल जाधव आणि प्रेम नागेश अण्णा गायकवाड यांनी स्पर्धेचे अत्यंत शिस्तबद्ध व दर्जेदार नियोजन केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्तिक जाधव व चेतन जाधव यांनी केले.

यावेळी भाजपा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, नगरसेविका संगीताताई जाधव, माजी महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनीताई चव्हाण, चैत्रालीताई गायकवाड, कल्पनाताई कदम, नगरसेवक तथा मंडई व उद्यान समिती सभापती राजशेखर पाटील, अक्षय अंजिखाने, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, अक्षय वाकसे, टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद गायकवाड, श्रीकांत गिड्डे, यशवंत पाथरुट, संगमेश्वर बगले, राधिका परब, दिपाली हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील १६ संघांनी सहभाग घेतला. धावते समालोचक पवार आणि डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध सोन्या बापू भोसले हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. अंतिम सामने चुरशीचे झाले. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी स्वतः मैदानात बॅटिंग करत खेळाडूंचे मनोबल वाढविले.

यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून अशा स्पर्धांमधून राज्याला दर्जेदार क्रिकेटपटू घडतील. तर आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, क्रीडा युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करते. किसन भाऊ जाधव व ईच्छा भगवंताची परिवाराने राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे .
स्पर्धेत SP 11 संघाने विजेतेपद पटकावले, KK राजहंस (उळे) उपविजेता ठरला, तर KK राजा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. विजयवीर वडाळा याला मॅन ऑफ द टूर्नामेंट व बेस्ट बॅट्समन, तर मजीद शेख यांना बेस्ट बॉलर पुरस्कार देण्यात आला. प्रथम क्रमांकासाठी ४६ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये रोख पारितोषिक व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.



