crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आईसह 14 वर्षांच्या चिमुरडीची आत्महत्या

 

सोलापूर

शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

​वर्षा पांडुरंग अधटराव (वय 33) आणि स्वरा पांडुरंग अधटराव (वय 14, दोन्ही रा. सुशील नगर, सैफुल सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी आई आणि मुलीची नावे आहेत.

नेमकी घटना काय?-

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर ते टिकेकरवाडी रेल्वे ट्रॅकवरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458/3C जवळ रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दोघी आई-मुलगी अत्यंत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. रेल्वे ट्रॅकवर अपघात झाल्याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस हेड कॉन्स्टेबल जी. एस. मणुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस हेड कॉन्स्टेबल जी. एस. मणुरे यांनी वेळ न दवडता दोघींनाही तातडीने उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 

​या घटनेमुळे सुशील नगर आणि संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. आई व मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले,याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button