maharashtrapoliticalsocialsolapur
जुळे सोलापुरातील बँक कॉलनी पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ
४० वर्षांपासूनचा मिटला प्रश्न : नागरिकांनी मानले नगरसेवक जयकुमार माने यांचे आभार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या जुळे सोलापुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील बँक कॉलनी येथे पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांची मागणी असलेला ४० वर्षांपासूनचा प्रश्न सोडवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नगरसेवक जयकुमार माने यांचे आभार मानले.
बँक कॉलनी येथे ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी आणि नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक जयकुमार माने, ब्रह्मदेव दादा माने बँकेचे संचालक सचिन चौधरी, राहुल लोभे , ईरेश खुणे , श्रीपाद आरोळे, रुद्रया हिरेमठ, मोहन पाटील, प्रदीप कोळी, उमेश चांडोले, समर्थ जाधव, अमोल आमोणे, वीरभद्रेश्वर दंडे, विनय वाळवेकर आदी उपस्थित होते.



