politicalindia- worldmaharashtrasocialsolapur

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश

राष्ट्रीय NQAS मानांकन: सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेच्या 3 आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन

 

सोलापूर, दि. 27:

 

 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांच्या दर्जा आणि सुविधांची पाहणी करून “राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन” – National Quality Assurance Standards – NQAS प्रदान करण्यात येते. रुग्णकेंद्रित सेवा, सुरक्षितता, स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रभावी सेवा वितरण या सर्व निकषांवरील हे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानांकन मानले जाते.

आज जाहीर झालेल्या NQAS मूल्यांकनाच्या निकालात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गेल्या 10 वर्षात प्रथमच 3 आयुष्मान आरोग्य मंदिरांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांमधून या वेळी निवड झाली नसल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्याला हा ऐतिहासिक बहुमान मिळवून दिला आहे.

राष्ट्रीय NQAS मानांकन प्राप्त आयुष्मान आरोग्य मंदिरे – AAM

1. *आयुष्मान आरोग्य मंदिर, मुस्ती* – प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर – *८४.३१%*
2. *आयुष्मान आरोग्य मंदिर, येवती* – प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटकुल, ता. मोहोळ – *८३.७३%*
3. *आयुष्मान आरोग्य मंदिर, औंधी* – प्राथमिक आरोग्य केंद्र, अंकोली, ता. मोहोळ – *८२.०%*

NQAS मानांकनाचे प्रमुख लाभ
– *गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आरोग्यसेवा*: उपकेंद्र स्तरावर रुग्णकेंद्रित, संसर्गमुक्त आणि दर्जेदार सेवा अधिक बळकट होणार.
– *प्रशासकीय सुधारणा*: सेवा वितरण, रुग्ण सुरक्षा, औषध व उपकरण व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन आणि रुग्ण समाधानात वाढ.
– *गुणवत्ता प्रोत्साहन निधी*: मानांकन प्राप्त संस्थांना NHM अंतर्गत विशेष प्रोत्साहन निधी मिळणार. या निधीतून पायाभूत सुविधा आणि आधुनिक उपकरणे वाढवता येणार.
– *ग्रामीण भागाला मोठा फायदा*: गावातच विश्वासार्ह, मोफत आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार.

हे ऐतिहासिक यश *पालकमंत्री ना. जयकुमार गोरे* यांच्या मार्गदर्शनाखाली, *मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन* व *आरोग्य सभापती श्री. चैतन्यसिंह केदार सावंत* यांच्या नियंत्रणात तसेच *जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक डॉ. मोहन शेगर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव* यांच्या सर्व टीमच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.

हे यश जिल्हा प्रशासन, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी – CHO, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

भविष्यात जिल्ह्यातील अधिकाधिक आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त करावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

चौकट
_”जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना NQAS मानांकन मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. जनतेला गावातच दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.”_
*- श्री. कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर*

*0000*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button