crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अभिमानास्पद ! सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सरकारी वकिल ॲड .प्रदिपसिंग मोहनसिंग राजपूत यांना कायदयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी प्रदान

सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सरकारी वकिल ॲड .प्रदिपसिंग मोहनसिंग राजपूत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ यांच्याकडून (घटस्फोटाचे म्हणजेच विवाह विच्छेदनाचे होणारे परिणाम) या विषयावर सखोल संशोधनासाठी विदयावाचस्पति डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.

 

 

 

दिनांक 02/08/2025 रोजी विदयापीठात झालेल्या मौखीक सादरीकरणात त्यांनी आपल्या संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष मांडले आणि घटस्फोटामुळे घटस्फोटीत पती-पत्नी, घटस्फोटीतांचे मुलबाळे, घटस्फोटीतांचे माता-पिता आणि घटस्फोटीतांचे दोन्ही परिवार व समाजावर होणारे परिणाम तसेच घटस्फोटाची कारणे, घटस्फोटापूर्वी आणि घटस्फोटानंतर येणा-या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी कायदयामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा यावर त्यांनी अभ्यासपूर्ण अशी मते मांडून, हिंदू विवाह कायदयामध्ये व इतर धर्माच्या कायद्यामध्ये सध्य परिस्थितीनुसार काय सुधारणा होणे आवश्यक आहे तसेच त्याला अनुसरून घटस्फोट संबंधातील पिडीतांसाठी जलत गतीने न्याय मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्याची असलेली परिस्थिती आणि पुढे उद्भवणारी परिस्थिती यामध्ये कोणत्या सोयी व सुधारणा होणे आवश्यक आहे तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या कायदयामध्ये देखील घटस्फोटीतांना जलत गतीने न्याय होणेसाठी महत्त्वपूर्ण अशा सुधारणा सुचविलेल्या आहेत. अॅड. श्री. राजपूत यांचे सदर विषयाचे संधोधन दयानंद विधी महाविदयालयाचे माजी प्राचार्य डॉ. यु. मंगापतीराव सर आणि सध्याचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोनाली गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाले.

जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत

 

सदर मौखीक सादरीकरणावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. श्री. वसंत कोरे तर, बाहय परिक्षक म्हणून कोल्हापूर येथील डॉ. एम.सी. शेख आणि मार्गदर्शक डॉ. सोनाली गायकवाड यांनी मौखीक सादरीकरण सादर करून घेतल, त्याचप्रमाणे सदरवेळी दयानंद महाविदयालयाचे सध्याचे व्यवस्थापन पाहणारे डॉ. श्री. उबाळे सर, दयानंद कला,

आणि विज्ञान महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दामजी सर, दयानंद शिक्षणशास्त्राचे प्राचार्य डॉ. क्षिरसागर सर, दयानंद वाणीज्य महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अॅड. श्री. राजपूत यांनी सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सरकारी वकील म्हणून गेली जवळपास ७ वर्षे ते काम करत आहेत, तर त्यांना फौजदारी वकिली व्यवसायाचा जवळपास 30 वर्षांचा दांडगा अनुभव असून, एवढ्या व्यस्ततेतून त्यांनी सदरचा संशोधन अहवाल पूर्ण करून, तो विदयापीठाकडे सादर केला आहे. सदरचे कार्य करत असताना, अॅड. श्री. राजपूत यांनी आजपर्यंत एकूण १०९ गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा तर, 2 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा घेतली असून, इतर अनेक गुन्हेगारांना १ वर्ष ते २५ वर्षापर्यंत शिक्षा घेण्यामध्ये त्यांनी यश मिळविले आहे, तसेच इतर अनेक गुन्हयांमधील आरोपींचे नियमित व अटकपूर्व जामीनाचे अर्ज नामंजूर करून घेतले आहेत. त्याचबरोबर अॅड. श्री. राजपूत हे सध्या विशेष सरकारी वकिल म्हणून पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथील महत्त्वाच्या व गाजलेल्या खटल्यामध्ये काम पाहत आहेत.

 

 

त्याचबरोबरीने ते मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे देखील विशेष सरकारी वकील म्हणून काही प्रकरणात सरकारची बाजू मांडत आहेत. सदरच्या यशामुळे अॅड. श्री. राजपूत यांच्यावर समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button