विधानसभेत गाजलेल्या दूध भेसळ प्रकरणातील आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर:- ॲड. निलेश जोशी….

सोलापूर
यात हकीकत अशी की,
दि. २०/०२/२०२५ रोजी करकंब ता पंढरपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक, कुंजीर यांना अशी माहिती मिळाली की, मौजे भोसे येथील जाधव यांनी त्यांच्याकडे कोणतेही दूध देणारे गाय व म्हैस अशी जनावरे नसताना देखील व दूध संकलनाचा परवाना नसताना देखील त्यांच्या राहते घरातील पत्रा शेडमध्ये अनेक भेसळ मिश्रित पदार्थ एकत्र करून भेसळयुक्त व बनावट दूध बनवण्याची पेढी सुरू करून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तयार करून अनेक दूध संकलन केंद्रांमार्फत विक्री करत असल्याचे बातमी मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन धाड घातली असता, त्या ठिकाणी मुख्य आरोपी हे अनेक भेसळयुक्त पदार्थांच्या मदतीने बनावट व भेसळयुक्त दूध करत असल्याचे व भेसळयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आलेला होता. त्यानुसार याबाबतची सर्व माहिती त्यांनी अन्न व भेसळ निरीक्षक, सोलापूर यांना दिली.
त्यानुसार उमेश भुसे, अन्न व सुरक्षा अधिकारी, सोलापूर यांनी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम व भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये करकंब पोलीस ठाण्यामध्ये रीतसर फिर्याद दाखल केलेली होती.
सदर तपासाचे गांभीर्य व व्याप्ती पाहता सदर प्रकरणाचा तपास हा डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांच्याकडे देण्यात आलेला होता. सदर प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी एकूण दहा आरोपींना अटक करून अनेक भेसळयुक्त पदार्थ व आर्थिक व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जप्त करून आरोपींविरुद्ध पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते.
या प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब बाळासाहेब काळे, नंदिकेश्वर दूध संकलन केंद्र यांना देखील अटक करण्यात आलेले होते. त्यांचा जामीन अर्ज पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी फेटाळलेला होता. त्यामुळे आरोपी भाऊसाहेब काळे यांनी मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई येथे जामीनासाठी अर्ज दाखल केलेला होता.
सदर जामीन अर्जाची चौकशीवेळी ॲड. निलेश जोशी, सोलापूर, यांनी प्रस्तुत प्रकरणात आरोपीस संशयाच्या कारणावरून अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध लावण्यात आलेली कलमे ही चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यापृष्ठार्थ मा. ना. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले होते. आरोपी भाऊसाहेब काळे याच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायमूर्ती श्री. अश्विन बोबे साहेब यांनी आरोपीची जामीनावरती मुक्तता केलेली आहे.
सदर प्रकरणात आरोपी भाऊसाहेब काळे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. प्रसाद कुलकर्णी, ॲड. अमोल कणकी यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. अनामिका मल्होत्रा यांनी काम पाहिले.