जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या कारवाईतील अटक वकील साजिद शेख यांना जामीन मंजूर..अॅड. शशी कुलकर्णी

सोलापूर-
येथील रहिवासी जी एस टी सल्लागार वकील साजिद अहमद शेख (वय ४६, र सोलापूर) यास ‘ बोगस कंपन्यांची खरेदी- विक्रीची बिले सादर करून त्याद्वारे सुमारे 44 कोटी रुपयांची वस्तू व सेवा विक्री कर (जीएसटी) फसवणूक केल्याप्रकारणीच्या गुन्ह्यात कोल्हापूर येथील न्यायदांडाधिकारी कोर्टाने जामीन मंजूर केला.
यात जी एस टी कार्यालयाचा आरोप असा की, सोलापूर येथील जी एस टी सल्लागार वकील साजिद अहमद शेख याने ३० बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या, आरोपी हा प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय होता, त्यावरून केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने अटकेपूर्वी आरोपीच्या सोलापुरातील कार्यालयावर छापा टाकला होता. त्याचदिवशी त्याच्या 12 कंपन्यांची ‘चौकशी केली. त्यात सुमारे 44 कोटी पर्यत कर चोरी केल्याचे जी एस टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.
इतर 18 कंपन्यांसह कर चोरीची रक्कम 44 कोटींच्या वर वाढण्याच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे,सदर आरोपीने शासनाची गेल्या चार वर्षापासून कर चोरी करून फसवणूक केल्याप्रकारणी दिनांक 22/5/2025 रोजी अटक केली होती.त्यानंतर सदर आरोपीची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. सदरकामी आरोपीने कोल्हापूर येथील न्यायल्यामध्ये जामीन अर्ज दाखल केला.सदर जामीन अर्जाची सुनावणी झाली. सदर वेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायाल्यासमोर असा युक्तिवाद केला की, आरोपीस केवळ संशयच्या आधारे अटक झालेली आहे, आरोपीने कोणाचीही फसवणूक केलेली नाही अथवा कर चुकवेगिरी देखील केलेली नाही, आरोपीस अटक करुन 60 दिवस झाले आहेत .
सदरच्या आरोपीविरुद्ध वेळेत आरोप पत्र दाखल केलेली नाही, त्यामुळे आरोपी जमिनास पात्र आहे, आरोपी वकील असून कार्यवाही कामी संपूर्ण सहकार्य करत आहे त्यामुळे आरोपीस जमिनावर सोडावे. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. आरोपीच्या जामीनास सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला. तथापि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस पासपोर्ट जमा करण्याच्या, तपासकामी सहकार्य करण्याच्या, परदेशात न जाणाच्या, तसेच 10 कोटी रक्कम कोर्टात जमा करणेच्या अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला.
सदरकामी आरोपीतर्फे यांचेतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड.देवदत्त बोरगावकर अॅड.सचिन शिंदे ( कोल्हापूर )यांनी तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड.शेखर टोणपे यांनी काम पहिले.
प्रकरण क्रमांक DGGI 580/2025.
कोर्ट – एस. जे. शिंदे