crimemaharashtrapoliticalsocialsolapur

एमआयडीसी पोलिसांकडून शहरातील दोन घरफोड्या उघडकीस एकूण १ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत….

सोलापूर

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसापासुन होत असलेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरीता मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार सो, पोलीस उप-आयुक्त (परि.) श्री. विजय कबाडे व सपोआ वि-१ श्री. प्रताप पोमण यांनी वपोनि/एमआयडीसी पोलीस ठाणे श्री. प्रमोद वाघमारे यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे वपोनि/एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि भरत चंदनशिव यांचेसह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशीत केले होते.

 

 

त्यानंतर दि. ०१/०८/२०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली होती की, कोड्याल शाळेजवळ ०२ इसम सोने विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून सदर ०२ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे १) बंडु मधुकर पवार वय २८ रा. ढोक बाभुळगाव, ता मोहोळ, जि सोलापूर (२) उमेश प्रकाश काळे वय ३० रा. मलीक पेठ, ता मोहोळ, जि सोलापूर असे सांगितले. त्यानंतर त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर, एमआयडीसी, सोलापूर व बोळकोटे नगर, एमआयडीसी, सोलापूर येथे झालेल्या रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबुल केल्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ४८८/२०२५ भान्यासंक ३३१(३), ३३१ (४), ३०५ (अ) व एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ५३६/२०२५ भान्यासंक ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ) मधील गेला मुद्देमाल पैकी ३७.३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १९८.८० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने हस्तगत करून एकुण १,९१,७००/- रू किं मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

 

 

उघडकीस आणलेले गुन्हे खालीलप्रमाणे

१) एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ४८८/२०२५ भान्यासंक ३३१(३), ३३२(४), ३०५ (अ)

२) एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं ५३६/२०२५ भान्यासंक ३३१(३), ३३१ (४), ३०५ (अ)

 

 

ही  कामगिरी मा. पोलीस आयुक्त सोो श्री. एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त सो (परि.) श्री. विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त सोो (वि.१) श्री. प्रताप पोमण, वपोनि/प्रमोद वाघमारे, पोनि/विजय खोमणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि /भरत चंदनशिव, पोहेकॉ राकेश पाटील, पोहेकॉ एकनाथ उबाळे, पोहेकॉ/ सचिन भांगे, पोना/मंगेश गायकवाड, पोकों/सुहास अर्जुन, पोकों/शंकर याळगी, पोकों/कुमार बोल्ली, पोकॉ शैलेश स्वामी, पोकॉ अमर शिवसिंगवाले, पोकों/किशोर व्हनगुंटी, पोकों/अविनाश डिगोळे, पोकों/अमसिध्द निंबाळ, पोकों/सकलेन मुकादम, पोहेकॉ अय्याज बागलकोटे यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button