सावळेश्वर ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते तर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार थाटात उदघाटन…

सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हुतात्मा स्मृती मंदिरात नुकताच कार्यकर्ता संवाद मेळावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला. या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार संजय मामा शिंदे ,
माजी आमदार यशवंत माने, कल्याणराव काळे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे,शशिकांत कांबळे, उदय माने , यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्याचे विकास रत्न उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा एकत्रित वाढदिवस हुतात्मा स्मृती मंदिरात धूमधडाक्यात जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी साजरा केला.
तदनंतर मेळाव्याला सुरुवात झाली. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीवेळी
अजित दादांच्या विचारांशी गद्दारी केलेले दादांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणारे पुन्हा पक्षात आलेल्या उमेश पाटील यांनी सोलापूर शहरात लुडबुड सूरू केली अशी तक्रार जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी प्रदेशाध्यक्षांकडे कार्यक्रम दरम्यान केली होती.
यानंतर आता संतोष पवार यांचा ग्रामीण जिल्हा दौरा होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय.
शुक्रवार दिनांक ८/०८/२०२५ रोजी सावळेश्वर ग्रामपंचायत भव्य विकास कामांचे उदघाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली धूमधडाक्यात केले जाणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ाचे नेते माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जिल्हा परिषद सदस्य तथा लोकनेते शुगर फॅक्टरी चेअरमन बाळराजे पाटील , सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील ,मोहोळचे भाजपा तालुका अध्यक्ष सतीश काळे या मान्यवरांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी आयोजक ग्रामचपंचायत सावळेश्वर यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे .