india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहकार्याने किसन जाधवांच्या प्रयत्नातून ५० लाखांचा निधी…

सोलापूरच्या विकासासाठी अजित पवारांचे मोठे योगदान-किसन जाधव

 

पालिका आयुक्त डॉ.ओंबासे, धर्मराज काडादी यांच्या हस्ते श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे शुभारंभ

सोलापूर -विजापूर रोडवरील मोतीबाग येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे हे मंदिर भगवान शिव आणि सिध्दरामेश्वर यांना समर्पित आहे सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे याच मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परीक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व संहिता पुरविणे सन २०२४-२५ या हेड अंतर्गत श्री रेवणसिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला या सुशोभीकरण कामाचे शुभारंभ पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत ईच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचे शुभारंभ करण्यात आले.

 

याप्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सिद्धाराम चाकोते, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, मंदिराचे पुजारी सिद्धाराम शिंगारे, ज्येष्ठ नागरिक शिवराया बुक्कानुरे मामा, श्रीमंत सुरवसे काका, राहुल हत्ती, मल्लू जाधव, चंदू माने गवळी ,संभाजी सुरवसे, बसवराज पाटील, प्रज्वल जाधव, संजू भडंगे, सोनू तळभंडारे, बसवराज आळंदीकर, अजय चव्हाण, यश माने, अभिषेक बिराजदार, अमर रबकवी,प्रकाश चव्हाण, वीरेश केंगार, अशोक बिराजदार राजू मारुती वनस्कर, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार मावशी, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड आदींची उपस्थिती यावेळी होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केले.प्रारंभी पालिका आयुक्त डॉ. ओंबासे, धर्मराज काडादी आणि उपस्थित मान्यवरांनी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराचे पाहणी करून श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या पूजनाने या मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे फलकाचे उद्घाटन यावेळी धार्मिक विधिवत पूजन करण्यात आले. तसेच यावेळी श्रावण मास निमित्त पारंपारिक वाद्यासह दर कुंभार वेस येथून रविवारी श्री रेवणसिद्धेश्वर पियी पालखी सोहळा मोतीबाग विजापूर रोड येथे आगमन होत असते याच पालखी सोहळ्याचे मनोभावे दर्शन घेऊन उपस्थित मान्यवरांनी रेवणसिद्धेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वांच्या पावन नगरीत शहराच्या मध्यभागी असलेल्या श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे श्रावण मास निमित्त लाखो भक्त दर्शनासाठी मंदिरात येत असतात मंदिर परिसरात भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंदिर परिसर सुशोभीकरण आणि सोलापूर शहराच्या अन्य विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला होता तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी ७ कोटी रुपये मंजूर केले यामध्ये श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण साठी ५० लाख रुपयांचा निधीची तरतूद त्यांनी केला.

याच कामाचे आज शुभारंभ करण्यात आले श्रावण मास निमित्त मोठ्या प्रमाणात भक्तगण हे दर्शनासाठी येत असतात अत्यंत पवित्र असे हे धार्मिक स्थळ आहे भक्तांसाठी परिसरात सुलभ शौचालय, परिसरात दिवाबत्ती, ड्रेनेज व अन्य कामे मार्गी लागावे तसेच प्रामुख्याने या परिसरात रस्त्याचा प्रश्न मार्गे लावावा आणि मंदिर परिसरात असलेल्या विहिरीची दुरुस्ती, सुरक्षेच्या दृष्टीने विहिरीला जाळी बसवणेसाठी पालिका आयुक्तांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे आणि सोलापूर शहराच्या विकासासाठी अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे खूप मोठे योगदान असल्याचे यावेळी प्रास्ताविकात किसन जाधव यांनी मागणी केली. या मंदिर परिसर सुशोभीकरणामुळे मंदिराच्या सौंदर्यात मध्ये आणखीन भर पडणार आहे असेही किसन जाधव म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केले. श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन कालीन असून या मंदिराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या पावन नगरीमध्ये रेवणसिद्धेश्वर मंदिरात सर्व धर्मीय भक्तांची दर्शनासाठी ओढ लागलेली असते या मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून अजित पवार यांच्या माध्यमातून ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला. मंदिरात येणाऱ्या भक्तांना सोयी सुविधा मिळाव्यात या दृष्टीने या पुढील काळात या परिसराचा विकास किसन जाधव आणि मंदिर समितीच्या वतीनं नक्कीच होईल किसन जाधव यांच्या प्रयत्नातून ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि किसन जाधव यांचे आभार मानत धर्मराज काडादी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भक्तांच्या सोयी सुविधा साठी पालिकेच्या वतीनं जे सहकार्याची अपेक्षा असेल ते तत्काळ पूर्ण करू मंदिराचे पावित्र राखण्यासाठी किसन जाधव यांच्या मागणीनुसार भक्तांना चांगल्या सोय सुविधा उपलब्ध करून देऊ सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे शहरांमध्ये काम करत असताना मला देखील बळ मिळेल नक्कीच विकासाच्या दृष्टीने सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. या मंदिर परिसर सुशोभीकरण शुभारंभ प्रसंगी या परिसरातील नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले तर आभार आनंद मुस्तारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button