गुरू – शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरातील नामांकित शाळेतील स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकानेच केला दहावीतील विद्यार्थिनीवर विनयभंग सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
घटनेनंतर शिक्षक फरार...

सोलापूर
गुरू – शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली आहे. होम मैदान येथील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बघून घेण्याची धमकी देत विनयभंग केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्याचे झाले असे की होम मैदान येथील नामांकित शाळेमध्ये एप्रिल महिन्यात अंतिम सत्राच्या शेवटच्या पेपर दिवशी नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडून विनय भंग केला होता .
उन्हाळी सुट्टी संपून पुन्हा शाळा सुरू झाल्यावर त्याच शिक्षिकाने पुन्हा त्याच विद्यार्थिनीला इयत्ता १० वीच्या शैक्षणिक क्षेत्रास सुरुवात होताच त्रास देण्यास सुरुवात केली. त्या पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करून
“तू आता दहावीत गेलीस ,तुला बघून घेतो “ ,अशी धमकी दिली. यात विशेष सांगायचे झाले तर हा नराधम शिक्षक नववी – दहावीतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देतो. मागील वर्षी याच शाळेत एका शिक्षकाने त्याच शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता.आता याच हा दुसरा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शाळेत शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनीचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातोय. पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय . अशा शिक्षकांची शाळेतून हकालपट्टी करण्याची मागणी पालक वर्गातून केली जातेय.
या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीच्या सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पालकांनी शाळेकडे CCTV फुटेज मागणी केली तेव्हा शाळेने ही हात वरती करत केवळ १५ दिवसांचे CCTV फुटेज उपलब्ध असल्याचे सांगितले. एवढी गंभीर घटना घडूनही शाळा या घटनेकडे गांभीर्याने घेत नसल्याचे सिद्ध होत आहे . या घटनेनंतर शाळा व्यवस्थापक संबंधित शिक्षकावर काय कारवाई करतात ? हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे.
संबंधित शिक्षकावर पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्या नंतर शिक्षक फरार झाल्याचे वृत्त आहे . शिक्षकाच्या शोधासाठी सदर बझार पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे. या घटनेनंतर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. .