साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संघर्ष मित्र परिवाराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत…

वायफळ खर्चाला फाटा देत संघर्ष मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (तोगाराम भाऊराव साठे), हे १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (मांग समाज) जिथे जन्मले होते, सामाजिक उपक्रम, साहित्य आणि लोकसाहित्याच्या क्षेत्रात आपले अमिट योगदान देणारे एक महान व्यक्तिमत्व आहेत .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक–सांस्कृतिक परिवर्तनासाठी अढळ स्तंभ आहेत. त्यांच्या विविध माध्यमांतून व्यक्त झालेल्या विचारांनी अनेक वर्गांना न्याय, सशक्तीकरण आणि जागरण दिले आहे. त्यांचा प्रभाव आजही पुरा महाराष्ट्र आणि भारतभर जाणवतो.
त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या १०५ व्या. जयंती निमित्त वायफळ खर्चाला फाटा देत संघर्ष मित्र परिवाराच्या वतीने सोलापूर महानगर पालिका नंबर २७ येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी मंडल उपाध्यक्ष तथा संघर्ष मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष किशोर बोराडे , प्रशासकीय अधिकारी संदीप मस्के , रोहन लोंढे माहिती अधिकार अध्यक्ष नागेश शिंदे , वरिष्ठ लिपीक जालिंदर शिंदे , सोमनाथ लोखंडे श्रीनिवास जाधव , पवार यांच्यासह संघर्ष मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…