crimeindia- worldmaharashtrapoliticalsocial
बाळासाहेब गायकवाड यांची एएसआयपदी पदोन्नती….

सोलापूर
: शहर पोलीस दलात कार्यरत असलेले बाळासाहेब गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे.
सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सध्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम पहात असणारे बाळासाहेब गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे. गायकवाड यांनी यापूर्वी सोलापूर पोलीस आयुक्तालय विशेष शाखा सुरक्षा शाखा गुन्हे शाखा आणि पोलीस मुख्यालयात काम केले आहे.
पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपटे ग्रुपच्यावतीनं बाळासाहेब गायकवाड यांच्या बढतीनिमित्त यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विनय आपटे, नितीन आपटे, अभिषेक आपटे, यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.