crimemaharashtrapoliticalsocialsolapur

ब्रेकिंग:- वैभव वाघे खून खटला:- प्रमोद गायकवाड याच्या व सहा आरोपींच्या जामीन अर्जावर व प्रमोद गायकवाडचे जेल वर्ग करण्याचे अर्जास मूळफिर्यादी व सरकार पक्षाचा विरोध….

 

 

 

सोलापूर

 

शहरातील वैभव वाघे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी माजी महापौर प्रमोद गायकवाड याने त्याची कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करण्याची कारवाई व्हावी यासाठी तसेच प्रकरणात तपास पूर्ण झाल्यामुळे जामीन मिळण्यासाठी सहा आरोपींनी अर्ज दाखल केलेला आहे. त्यास मूळ फिर्यादी व सरकारपक्षाकडून प्रमोद गायकवाड यास सोलापूरात येऊन साक्षीदारांवर दबाव आणायचा असल्याने कडाडून विरोध दर्शविण्यात आलेला आहे.

 

यात हकीकत अशी की, दि. ०१/०१/२०२५ रोजी गल्लीतील जुन्या भांडणाचा राग मनात धरुन वैभव वाघे व इतर चौघांना जबर मारहाण झाली होती. यात वैभव वाघेचा उपचारादरम्यान ०६/०१/२०२५ रोजी मृत्यु झाला. त्याबाबत दि. १/१/२०२५ रोजी सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होवून प्रमोद गायकवाड यास व इतर ८ जणांना वेळोवेळी अटक झाली. त्या प्रकरणात पोलीसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्याची प्राथमिक सुनावणी सत्र न्यायालयासमोर सुरु झाली आहे.

 

 

दरम्यान प्रमोद गायकवाड यास कळंबा येथील कारागृहात ठेवले असून प्रकरण हे सुनावणीच्या टप्यात येत आल्याने कुटुंबातील नातेवाईकांना कळंबा येथे जावून भेटणे गैरसोयीचे होत आहे त्यामुळे आपल्याला कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करावे अशी अर्जाद्वारे विनंती केली आहे व सहा आरोपींना जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

 

 

सदर खटल्यातील आरोपी प्रमोद गायकवाड याचे कारागृहातून वर्ग होण्याच्या अर्जास व त्याच्या सह इतर आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जास मूळफिर्यादीच्या वकिलांनी मूळ फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध दर्शविला आहे.
प्रमोद गायकवाड यास सोलापुरात येऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहून साक्षीदारांवर दबाव टाकायचा असल्याने व त्याचा हेतू योग्य नसल्याने त्यास वर्ग करू नये असा युक्तिवाद मूळ फिर्यादी व सरकारपक्षातार्फे करण्यात आला.यात पुढील सुनावणी दि.,9/7/2025 रोजी नेमलेली आहे.

 

यात मूळफिर्यादीतर्फे अँड. संतोष न्हावकर,अँड. राहुल रूपनर, अँड. शैलेश पोटफोडे सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button