वैभव वाघे खून खटला प्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांचा जामीन अर्ज व जेल वर्ग करणेवर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण. ॲड. शशी कुलकर्णी….

सोलापूर :
सोलापूर शहरातील वैभव वाघे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी प्रमोद गायकवाड यांनी आपली कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करण्याची कारवाई व्हावी यासाठी तसेच प्रकरणात तपास पूर्ण झाल्यामुळे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
यात हकीकत अशी की, दि. ०१/०१/२०२५ रोजी गल्लीतील जुन्या भांडणाचा राग मनात धरुन वैभव वाघे व इतर दोघांना जबर मारहाण झाली होती. यात वैभव वाघे चा उपचारादरम्यान ०६/०१/२०२५ रोजी मृत्यु झाला. त्याबाबत दि. १/१/२०२५ रोजी सदर बझार पोलीस येथे गुन्हा दाखल होवून सोलापूरचे माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांना व इतर ८ जणांना वेळोवेळी अटक झाली. त्या प्रकरणात पोलीसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्याची प्राथमिक सुनावणी सत्र न्यायालयासमोर सुरु झाली.
दरम्यान प्रमोद गायकवाड यांना आपल्याला कळंबा येथील कारागृहात ठेवले असून प्रकरण हे सुनावणीच्या टप्यात येत असल्याने वकिलांना भेटणे,माहिती देणे,तसेच कुटुंबातील नातेवाईकांना कळंबा येथे जावून भेटणे गैरसोयीचे होत आहे त्यामुळे आपल्याला कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करावे अशी अर्जाद्वारे विनंती केली आहे. तसेच प्रकरणात तपास पूर्ण झाल्याने व ते कोर्ट तारखेस हजर होणेसाठी हमी देत असल्याने, तसेच त्यांचे विरुध्द सबळ असा पुरावा नसल्याने, जामीन देण्यात यावा अशी विनंती त्यांनी अर्जाद्वारे केली.
सदर अर्जावर आरोपीचे वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सरकार पक्षाच्या युक्तिवादसाठी दि.,9/7/2025 रोजी तारीख नेमलेली आहे. यात आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅडआदित्य अदोने सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार हे काम पाहत आहेत…