india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान..

 

सोलापूर / प्रतिनिधी

नुकतीच सोलापूर न्यायालय बार असोसिएशनची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत नूतन अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव व त्यांचे सहकारी प्रचंड बहुमताने विजयी झाले. त्यानिमित्त शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान
सोलापूर न्यायालय बार असोसिएशन चे नूतन अध्यक्ष ॲड बाबासाहेब जाधव, ॲड श्रीकांत सफार ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सरचिटणीस श्यामराव गांगर्डे यांची उपस्थिती होती.

या नूतन पदाधिकाऱ्यांचा झाला विशेष सन्मान…

नूतन अध्यक्ष ॲड बाबासाहेब जाधव
उपाध्यक्ष ॲड.रियाज शेख
सचिव ॲड.बसवराज हिंगमिरे
खजिनदार ॲड.अरविंद देढे
सहसचिव ॲड मीरा प्रसाद
यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

तर नूतन मे.न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड बाबासाहेब जाधव यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळा हा परीवारीक सत्कार असुन मी मनापासून धन्यवाद मानतो उपमुख्यमंत्री अजित दादांच्या स्तरावर असलेले सोलापूर मे.बार असोसिएशनचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी आम्हाला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.यापूर्वी अनेक वेळा संतोष भाऊ व जुबेर भाई यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले .या पुढे देखील त्यांनी आमच्या समवेत असेच खंबीरपणे उभे रहावे असे मत व्यक्त केले.

यावेळी मनोगतात शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सुरुवातीस सोलापूर न्यायालय बार असोसिएशनच्या सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सोलापूर मे.न्यायालय बार असोसिएशन कोणताही प्रश्न प्रलंबित असेल तो उपमुख्यमंत्री अजित दादांच्या स्तरावर नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button