crimemaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर तालुका, पोलीस ठाण्यातील चारचाकी वाहनांची ओळख पटविण्याबाबत ….

 

 

सोलापूर

तालुका, पोलीस ठाणे येथे चारचाकी वाहनांचा मालकी हक्क कोणीही सांगितला नाही असे अर्टिगा ,मालट्रक, सुमो व जे.सी.बी असे खालील नमूद केलेले 4 चारचाकी वाहने हे सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस सुमारे 5 ते 8 वर्षा पासुन पडुन आहेत.
अ.नं. वाहन क्रमांक इंजिन क्रमांक चेसीस क्रमांक
1) जे.सी.बी. MH-13-DT-2782 4H2152/07077946 1263088H2007
2) टाटा सुमो MH-12-AN-1929 483DL45BZZ714723 418005BZZ905010
3) मालट्रक AP-26-TT-8888 01D62869534 MAT466372A5DO3074
4) मारूती अर्टिगा MH-12-KT-6770 D13A129662 MA3FLEB1S00179366

वर नमूद केलेले 4 चारचाकी वाहने पोलीस ठाणेच्या आवारात अस्ताव्यस्त पडुन असून त्या वाहनांच्या मालकी हक्काची ओळख पटत नसल्यामुळे वाहनांची निर्गती करणेस विलंब होत आहे.

वरील वाहन धारकांच्या रजिस्ट्रेशन नंबर वरून प्राप्त माहितीचे आधारे मालकांना त्यांचे पत्यावर माहिती दिली आहे. तरी देखील या कार्यालयात संपर्क केलेला नाही. तरी नमूद वाहनांच्या मालकी हक्का बाबत ज्या कोणाकडे कायदेशीर पुरावा असेल त्यांनी दिनांक 14.07.2025 रोजी पर्यत सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
याव्दारे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरील नमूद केलेले चारचाकी वाहने ज्या कोणा नागरिकांची आहेत अगर त्यांच्या नातेवाईकांची आहेत अशा नागरिकांनी त्यांच्या वाहनांचे मालकी हक्का बाबतचे पुरावे / वाहनांचे कागदपत्रे घेऊन सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथुन ओळख पटवावी.

वरील नमूद चारचाकी वाहनांचे मालकी हक्क सांगणारे कोणी त्याचे कडील पुरावे घेऊन आले नाहीत तर नमूद वाहनांचे कोणीही मालक नाहीत असे गृहीत धरून पोलीस ठाणेस पडुन असलेल्या वाहनांच्या निर्गती बाबत पुढील योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गतीची कार्यवाही करण्यात येईल याची कृपया सोलापूर जिल्हयातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी….

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button