बेकायदेशीररित्या अनुकंपतत्वावर शिक्षक भरती केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर…. ॲड. ऍड मिलिंद थोबडे…

सोलापूर
दि:- अनुकंप तत्वावर श्रीशैल शिवशंकर स्वामी यांची बेकायदेशीर रित्या शिक्षक म्हणून नियुक्ती केल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर शिवाजीराव बाबर वय 60 रा:- विश्रामबाग, सांगली यास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. जे. कटारिया यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या हकीकत अशी की, अक्कलकोट तालुका येथे श्रीमती धोंडूबाई शिक्षण प्रसारक मंडळ, चुंगी ही संस्था असून सदर संस्थेचे मौजे कोरनूर, ता अक्कलकोट येथे नागनाथ विद्याविकास प्रशाला आहे. संस्थेचे अध्यक्ष केशवराव माने हे मयत झाले. त्यानंतर सन 2022 पासून स्वामीराव पाटील हे संस्थेचे अध्यक्ष असून सदर संस्थेचे संपूर्ण दप्तर हे केशवराव माने यांचा मुलगा महादेव माने यांच्या ताब्यात आहे, तो शाळेचा मुख्याध्यापक असून संस्थेचा कारभार तोच पाहतो.
शिक्षक श्रीशैल स्वामी याचे वडील शिवशंकर स्वामी यांनी दि:- 3/9/2014 रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. शासनाच्या अनुकंप तत्व या धोरणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचारी सेवेत असणे गरजेचे असते.
शिक्षक श्रीशेल स्वामी यांच्या वडिलांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन देखील अनुकंप तत्वाखाली शिक्षक श्रीशैल स्वामी यांची बोगस ठराव करून बेकायदेशीररित्या नेमणूक केली व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी कोणती चौकशी न करता त्यास मंजुरी दिली असे आशयाची फिर्याद संस्थेचे अध्यक्ष स्वामीराव पाटील यांनी अक्कलकोट पोलीस ठाण्यात दिली होती.
आपणास अटक होऊ नये म्हणून त्यांनी ॲड मिलिंद थोबडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात सदरचा गुन्हा हा कागदपत्रे स्वरूपाचा असून सर्व कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात असल्याने कोठडीची कोणती आवश्यकता नाही, त्यावरून न्यायाधीशांनी 50,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
*यात अर्जदार/ आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे, ऍड. सतीश शेटे तर सरकारतर्फे ऍड प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.*