घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून 70.5 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत शहर गुन्हे शाखेची कामगिरी ….

दिनांक 28/06/2025 रोजी, सोलापुर शहरातील यशोधन बिल्डीग, पत्रकार नगर, येथील बंगल्यात खिडकीतुन प्रवेश करुन, सोन्याचे दागिणे चोरुन नेल्याबाबत, फिर्यादी पदमजा रणजीत बनहटटी, वय-63 वर्ष, व्यवसाय-वकील, रा.BC 85 कॅम्प लिटटन्न रोड, बेळगांव, कनार्टक, सध्या रा. यशोधन बिल्डीग, पत्रकार नगर, सोलापुर यांच्या तक्रारीवरून, अज्ञात चोरटयाविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गु र नं. 577/2025, भा.न्या.सं.क.331(4), 305 अन्वये, दिनांक 28/06/2025 रोजी गुन्हा दाखल आहे.
त्या अनुषंगाने, गुन्हे शाखेकडील स.पो.नि./विजय पाटील, व त्यांचे तपास पथक यांना, एक इसम हा, चोरीचे सोन्याचे दागिणे घेऊन 02 नंबर बस स्टैंड, शास्त्री नगर, सोलापुर येथे थांबले असल्याची गोपनिय खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. प्राप्त बातमीची शहानिशा करुन, कारवाई करणे कामी सदर ठिकाणी जावुन, इसम नामे- शुभम सीताराम कजाकवाले, वय 19 वर्ष, धंदा-मजुरी, रा.घर नं.580 लष्कर, 14 नंबर शाळेजवळ, उत्तर सदर बझार, सोलापुर यास चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र, बांगडया, अंगठी व कानातील रिंग या सोन्याचे दागिण्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर, नमूद इसमाकडे गुन्हयाचे अनुषंगाने, अधिक चौकशी केली असता, त्यांनी वरील प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानुसार, सदर बझार पोलीस ठाणे गु र नं. 577/2025, भा.न्या.सं.क. 331(4), 305 प्रमाणे दाखल गुन्हयातील 6,34,500/- रुपये किमतीचे, 70.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
ही कामगिरी मा. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. सुधीर खिरडकर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, (अति. कार्यभार), श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/विजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल तोगे, आवाजी सावळे, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विठठल यलमार, सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड चालक सतीश काटे यांनी केली आहे…