सपाटेला तात्काळ अटक करा पोलिसांना आदेश :- रूपाली चाकणकर { राज्य महिला आयोग अध्यक्ष }….
सबळ पुरावे असूनही सपाटेंवर BNS कलम ६३ का दाखल नाही ? ....

सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सपाटेंची पक्षातून हकालपट्टी केली.राज्यात खासदार सुप्रिया सुळे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेत असतात.आता त्यांच्याच पक्षातील माजी महापौराचा पर्दाफाश झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाने सपाटेंची बदनामी होत असल्याने हकालपट्टी केली. हकालपट्टी तर झाली मात्र खासदार सुप्रिया सुळे पीडितेला न्याय मिळवून देणार का ? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. या राज्यातील
शरद पवारांचे मानस पुत्र म्हणून सपाटे सोलापूर शहरात वावरतात . अश्लील कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत झाल्यानंतर विविध सामाजिक संघटना ,राजकीय पक्ष, समाज माध्यमांमध्ये सपाटेंचा निषेध होऊ लागला. सपाटे हे एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.संस्थेच्या अध्यक्षाचा हा कारनामा समोर आल्यानंतर शाळा ,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यातून नेमका काय बोध घ्यावा हा प्रश्न उपस्थित केला जातोय .सपाटे हे नेहमीच आजपर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत . या प्रकारामुळे पुन्हा एकदा सोलापूरसह राज्यात महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची प्रतिक्रिया …
सद्यस्थितीत सपाटेंवर फौजदार चावडी पोलिसांनी विनयभंगांचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र वास्तविक सपाटे यांनी पीडित महिलेला केलेले विचित्र हावभाव कॅमेरात कैद झाले असताना व गुन्ह्यात BNS कलम ६३ का दाखल केले नाही .पोलिसांच्या भूमिकेवर संशय असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणानंतर आपण पीडिता व ॲड.योगेश पवार यांना पोलिस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितलं .
राज्य महिला आयोगाचे आदेश…
या प्रकरणी राज्य महिला आयोगाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून राज्य महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या व्यक्तीने असे कृत्य करणे ही अशोभनीय आहे .ही बाब विकृत आहे .याबाबत राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांना प्रकरणाचा अहवाल तातडीने पाठविण्याचे आदेश दिले आहेत.पीडितेचे म्हणणे एकूण घेऊन त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.
माजी उपमहापौर दिलीप कोल्हे:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षाला उशिरा कळले हे शहाणपण. अनेक तक्रारी असूनही सपाटेंवर कारवाई केली जात नव्हती. सपाट्यांच्या प्रवृत्ती बाबत सांगायचं झालं तर सुरुवात कुटुंबापासूनच होते. याबाबत सपाटी कुटुंबीयांची प्रतिक्रिया घ्यायला गेली तर हा किती नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे हे सिद्ध होईल. सपाटे लिंग पिसाट व्यक्ती आहे हे तुम्हाला त्यांच्या मुलांकडूनच समजेल. सपाटेच्या नालायकपणामुळे त्याचा मुलगा ॲड. बाबासाहेब सपाटे यांनी वकिली सोडून दिली. या प्रकरणांमुळे सपाट्याच्या बाबतीत मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सपाटेच्या पूर्वीच्या प्रकरणात पिडीतेला न्याय मिळवून देण्याची भावना पोलिसांची दिसून आली नाही. त्यामुळे सर्व स्तरातून उठाव होऊ लागल्यानंतर पोलिसांनी सपाटेवर गुन्हा दाखल केला. सपाटे ज्या शिक्षण संस्थेवर अध्यक्ष आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या शालेय पोषण चा आहाराचे तांदूळ अवैधरित्या विकताना रंगहाथ सापडल्याने सपाटेवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपाटे तोंड दाखवा च्या लायकीचा कुठे उरला नाही. येणाऱ्या दोन-चार दिवसात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करून विस्तृत माहिती देणार आहोत …