Funrep fungame Gk (ऑनलाइन चक्रीगेम) अवैध व्यवसाय करणाऱ्या 23 आरोपीतांविरुध्द मा.न्यायालयात 4,983 पानांचे दोषारोपपत्र दाखल…..

आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी
सोलापूर
दिनांक 12/02/2025 रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं 56/2025 भादविसंक 120 (ब), 420, 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे *अवैधरित्या ऑनलाईन फनरेप ( चक्री ) गेमचे* माध्यमातून फसवणूक झालेबाबत आरोपी 1) नितीन महादु पाटमस, 2) रणजित महादेव सुतार, 3) वैभव बाबू सुतार सर्व रा. कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता…
सदर गुन्हा गंभीर व आर्थिक फसवणूकीचा असल्याने, मा. पोलीस अधीक्षक सोलापूर यांचे आदेशाने *दिनांक 17/04/2025 रोजी गुन्हयाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप* यांचेकडे वर्ग करणेत आला होता.
सदर गुन्हयांचे तांत्रिक विश्लेषन करुन आरोपीतांचे बँक खात्याची सखोल पडताळणी करुन तपासामध्ये केंद्र व राज्य शासनाचे परवानगीशिवाय अवैध Funrep fungame Gk ऑनलाईन चक्रीगेम व्यवसाय करणारे कंपनीचे एजंट, डिस्ट्रीव्युटर्स, सुपर डिस्ट्रिब्युटर्स यांचेसह एकूण 23 आरोपी निष्पन्न केले त्यांचे बँक खात्यावर 36,33,67,628/- रु. (छत्तीस कोटी तेहतीस लाख सदुसष्ट हजार सहाशे अट्ठावीस) इतक्या रक्कमेचा व्यवहार केलेचे निष्पन्न झाले असून यातील आरोपीतांनी गुन्हयांतील फिर्यादी व इतर 07 साक्षीदारासह आरोपीच्या बँक खाते उतारे पडताळणीवरुन एकूण 2,78,26,726/- (दोन कोटी अष्टयाहत्तर लाख सव्वीस हजार सातशे सव्वीस ) ची फसवणूक केलेल्या आरोपीतांविरुध्द दिनांक 27/06/2025 रोजी *4,983 पानाचे दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्यायालय, माढा यांचे कोर्टात दाखल करुन कुर्डूवाडी व बार्शी सह सोलापूर जिल्हयातील अवैध ऑनलाईन चक्री व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त केलेले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, दिपक चव्हाण यांचे नेतृत्वाखाली श्री. संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अतिरिक्त कार्यभार आर्थिक गुन्हे शाखा त्यांचे पथकातील सपोनि गणेश कड, श्रेणी पोसई गांगुर्डे, पोहेकॉ/ हनिफ शेख, नागेश वाघमोडे, माधव बोराडे, विनय यजगर, महिला पोना/ निता डोकडे, चालक पोकॉ/ जयेश काळोखे, सायबर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/ व्यंकटेश मोरे, स्वप्निल सन्नके तसेच कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि/ सचिन शिंदे व पोकॉ/पटाईत यांनी सदरची कामगिरी केली आहे .