माजी महापौर मनोहर सपाटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल….

सोलापुर-
येथील उद्योजक, प्रतिष्ठीत राजकारणी माजी महापौर श्री. मनोहरपंत सपाटे सोलापूर यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला असुन, त्याची अंतरिम जामीनावर प्राथमिक सुनावणी सोमवारी सत्र न्यायालयासमोर होणार आहे.
यांत आरोप असा की, दि. १६/०६/२०२५ व दि. २४/०६/२०२५ रोजी शिवपार्वती लॉजवर राहणाऱ्या एका विवाहितेचा गंभीर प्रकार करुन विनयभंग केला अशी फिर्याद फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे दाखल झाली आहे. त्यावरुन विनयभंगाचा अजामीनपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये अटकेची शक्यता निर्माण झाल्याने माजी महापौर सपाटे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यामध्ये अंतरिम जामीनाची मागणी असुन त्याची प्राथमिक सुनावणी सोमवारी होणार आहे.
सदरकामी माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांचेतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री हे काम पाहत आहेत…