माजी महापौर मनोहर सपाटेंचे अश्लील कृत्य “स्टिंग ऑपरेशन”कॅमेरात कैद घटना शिवपार्वती लॉज येथील …

पूर्वी अत्याचाराचा तर आता सपाटेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
सोलापूर : प्रतिनिधी
आपल्या लॉजवर बोलावून महिलेशी जबरदस्ती केल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ४५ वर्षीय पीडितेने गुरुवारी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान घडली. दरम्यान, या घटनेचे स्टिंग पीडित महिलेने केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार पीडित महिला ही पुण्याची राहणारी आहे. ती कोर्ट कामासाठी सोलापुरात येत होती. तेव्हा ती सोलापुरातील शिवपार्वती लॉजवर राहत होती. तेव्हा पीडितेची ओळख आरोपी सपाटे याच्यासोबत झाली. १७ जून रोजी पीडिता ही होटलमध्ये राहण्यासाठी गेली.ता तेव्हा सपाटे याने पीडितेच्या रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करत तिचा विनयभंग केला.
त्यानंतरही सपाटे यांनी पीडितेला वारंवार फोन करून त्रास दिला. तसेच वारंवार संबंध ठेवण्यास आग्रह धरला. दरम्यान, ही बाब पीडितेने एका व्यक्तीला सांगितली. त्याने पीडितेला तिच्या मोबाइलमध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय सांगितला. त्यानुसार आरोपीने बोलाविल्यानंतर पीडितेने २४ जून रोजी त्याच लॉजमधील रूममध्ये गेली. त्यानंतर आरोपीने पुन्हा जबरदस्ती करत पीडितेचा विनयभंग केला, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या प्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
यापूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल
यापूर्वी सुद्धा एका शिक्षिकेने गैरफायदा घेऊन सपाटे यांनी सतत लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिसात दाखल केलेली होती. परंतु पोलिसांनी त्या प्रकरणात तपास पूर्ण करून पुरावा मिळून येत नसल्याचा अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता. याबाबत न्यायालयात हरकत नोंदवून पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने सापटेंविरुद्ध पुन्हा तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिले होते व ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती मूळ फिर्यादीचे वकील अॅड. संतोष न्हावकर यांनी दिली.



