जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून चोरीचे २२ ग्रॅम सोने हस्तगत …
आरोपीस पोलिसांनी घेतलं ताब्यात ...

जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हा. रजि.नं. ६५५/२०२४ बी.एन.एस. कलम ३०५ (ए),३३१, (३),३३१ (४) प्रमाणे दिनांक-२८/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर सदर गुन्हयातील फिर्यादी नांमे प्रताप शिवानंद माडयाळ रा-प्लॉट नंबर- ०४ बलदवा नगर शेळगी सोलापुर यांच्या घरात दिनांक २६/११/२०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वा. ते २८/११/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घर फोडी करुन घरातील एकुण २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले असल्याची फिर्याद जोडभावीपठ पोलीस ठाणे येथे दाखल होती हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार सारे, पोलीस उप-आयुक्त साो. (परिमंडळ) श्री. विजय कबाडे सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास चव्हाण साो, यांनी डी.बी. पथकास आदेशीत केले होते.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने डी. बी. पथकातील पोहेकॉ/१६८५ आरेनवरु यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन सदर गुन्हयातील चोरी केलेला मुददेमाल विक्री करीता एक इसम येणार असले बाबत माहिती मिळाल्याने सपोनि महाडीक व डी.बी. पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपी राजकुमार पंडीत विभुते वय ४३ वर्षे रा-मु.पोस्ट. बोरामणी ता-दक्षिण सोलापुर यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेले दागीने जप्त केले आहे. वरील गुन्हयातील हस्तगत केलेले मुददेमालाचे वर्णन खालील प्रमाणे
१) ७५०००/- रु तीन जोडी सोन्याचे धातुचे कानातले १५ ग्रॅम वजनाचे जु.वा.कि.अं.
२) २५,०००/- रु एक सान्याच्या धातुची ०५ ग्रॅम वजनाची बिलवरी अंगठी जु.वा.कि.अं.
३) १०,०००/- रु चार सोन्याचे धातुचे लहान मुलांचे एकुण ०२ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या जु.वा.कि.अं
१,१०,०००/-रुपये एकुण किमंतीचे
ही कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री.एम. राजकुमार साो, पोलीस उप-आयुक्त साो. (परिमंडळ) श्री. विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. प्रताप पोमण साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास चव्हाण साो, पोनि/शबनम शेख साो (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/पडसळकर, सपोनि/महाडिक, पोहेकॉ/१६८५खाजप्पा आरेनवरु, पोहेकॉ / १३७० शितल शिवशरण, पोहेकॉ/९९३ विठठल पैकेकरी, पोकों/ ९८ अभिजीत पवार पोकॉ/१७३६ दत्ता मोरे, पोकॉ/१६२४ मल्लिनाथ स्वामी, पोकॉ/१३२१ बसवराज स्वामी, पोकॉ/६१३ स्वप्नील कसगावडे, पोकॉ/१५६५ दादासाहेब सरवदे, पोकॉ/१५०४ दत्ता काटे, पोकॉ/१५५५ काळजे, पोकॉ/१५३३ थिटे यांनी पार पाडली आहे.