crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

ब्रेकिंग:- अशिक्षित पणाचा गैरफायदा उठवत महिलेची फसवणूक दीर,जाऊ,पुतण्यासह पाच जणांवर गुन्हा बँकेतील सहा लाख घेतले काढून….

. सोलापूर

महिलेच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत उठवत जवळच्या नातेवाईकांनी वृध्द महिलेची फसवणूक केली. व्यवहारापोटी ठरलेली सहा लाखाची रक्कम सोलापूर जनता बँकेत जमा केलेली रक्कमही स्वत:च काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी दीर,जाऊ व पुतण्या,भाचा यांच्यासह पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा सदर बझार पोलिसांत दाखल झाला आहे.
याबाबत विजयालक्ष्मी नागनाथ बोगा (वय ६४ रा. जोडभावी पेठ,सोलापूर )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ भुमय्या बोगा, पुष्पावती नागनाथ बोगा, गूपेश नागनाथ बोगा,प्रशांत दशरथ कुडक्याल, राजेश चिप्पा अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना १८ मार्च २०२४ ते आजतागायत दुय्यम निबंधक कार्यालय,उत्तर सोलापूर व जनता बॅक पाच्छा पेठ सोलापूर याठिकाणी घडली आहे.

 

 

१८ मार्च २०२४ रोजी विजयालक्ष्मी वडीलांचे वर्ष श्राध्द असल्याने त्या भाऊ दशरथ कुडक्याल यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी विजयालक्ष्मी बोगा यांचे दिर नागनाथ,जाऊ पुष्पावती, पुतण्या भूपेश,भाचा प्रशांत व नातलग राजेश चिप्पा यांनी संगनमत केले. काम असल्याचा बहाणा करून फिर्यादीस पाच्छा पेठ येथील सोलापूर जनता बॅकेत घेवून गेले. फॉर्मवर विजयालक्ष्मी यांचे अंगठे घेवून त्याचे नावे बॅकेत खाते उघडले. त्यानंतर फिर्यादीच्या मयत पतीच्या नावे शासनाकडून पैसे मिळणार आहेत,जिल्हा परिषद येथे सर्व काम झाले आहे. आपणास कार्यालयात जावून फक्त सह्या करायच्या बाकी आहेत. असा बहाणा केला. विजयालक्ष्मी यांना रजिस्टर कार्यालयात नेले. अशिक्षित पणाचा फायदा घेत मनपा हद्दीत असलेले तिचे घर आरोपींनी खरेदी करून नागनाथ व पुष्पावती यांच्या नावावर करून घेतले.

 

 

 

त्यानंतर सदर दस्तमध्ये व्यवहारापोटी ठरलेली सहा लाखाची रक्कम फिर्यादीच्या जनता बॅकेत जमा केल्याचे दाखवले. मात्र ती रक्कम आरोपीनी फिर्यादीच्या संमतीविना २७ मार्च, ३० मार्च व ३ एप्रिल २०२४ रोजी जनता बॅकेच्या खात्यावरून परस्पर काढून घेतली,ती रक्कम फिर्यादी महिलेस न देता फसवणूक केली असल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणाचा तपास सहा पोलिस निरीक्षक जगताप करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button