कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध जपले जातील:-उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील….

सोलापूर
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांनी आज राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या भेटीप्रसंगी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली तसेच माझे काका स्व. महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाला मा. चंद्रकांत दादांनी उजाळा दिला.
प्रयागराज येथे झालेल्या महेश अण्णांच्या निधनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यापुढेही कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध जपले जातील असा शब्द चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, माजी महापौर श्रीकांचनाताई यन्नम, मोहन डांगरे, अविनाश महागावकर, माझे मोठे बंधू डॉ. सूर्यप्रकाश कोठे, माजी नगरसेवक आणि स्व. महेश अण्णांचे चिरंजीव प्रथमेश दादा कोठे, माजी स्थायी समिती सभापती विनायक दादा कोंड्याल, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, संतोष सोमा, आप्पा आंदेवाडी, अंबादास चाबुकस्वार, सागर भोसले, वासुदेव इप्पलपल्ली, रियाज मोमीन, हणुमंत रकटे, सिध्देश्वर कमटम, गणेश साळुंके, शैलेश कडदास, धनराज दुडम, अश्विन कोडम, अमन दुबास आणि कोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते.