ब्रेकिंग:- शिवबाबा ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांच्या बॅगा अज्ञात चोरट्याने नेल्या पळवून घटनेनंतर प्रवाशांनी गाठले थेट फौजदार चावडी पोलीस ठाणे….
प्रवाशांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

सोलापूर
यात थोडक्यात हकीकत अशी की , दिनांक ३०/०५/२०२५ रोजी मध्यरात्री २ ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिर्डी ते सोलापूर या प्रवासा दरम्यान सोलापुरातील शिवबाबा ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक एम.एच १३ डी क्यू ५०७३ या वाहनाच्या पाठीमागील प्रवास बॅग डीग्गीतून या वाहनातून प्रवास करणारे नागालक्ष्मी लक्ष्मीनारायण दंतु वय ४० वर्षे राहणार मक्केन वारगुडम , नरशापूरम मंडलम जिल्हा येलूर राज्य आंध्रप्रदेश व त्यांच्या सोबतचे इतर प्रवासी हे त्यांच्याकडील प्रवासात असलेल्या बॅगा नमूद वाहनाच्या डिग्गीत ठेवून प्रवास करीत होते . या प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने रात्री २ ते सकाळी ७ च्या वेळेत या प्रवाशांच्या बॅगा पळवून नेल्या .

तक्रारदार प्रवासी
फिर्यादी नागालक्ष्मी लक्ष्मीनारायण दंतु यांच्यासह पी नागमणी, लक्ष्मी प्रसन्ना , जी मणी, एम.कृष्णराव , श्रीनिवास नारायण , मुनींदराराव ,नरसम्मा , ए.रामण्णा , कृष्णवेण्णी, व्यंक्ययम्मा ,धनलक्ष्मी , शासम्मा , एन. नागेश्वरराव यांचे रोजचे वापरात असलेले कपड्यांच्या बॅगा अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याप्रकरणी प्रवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला..

या घटने नंतर सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण , फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने,पोलिस निरीक्षक दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे , सपोनी पाटील यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट दिली….



