Businessindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले” या म्हणीप्रमाणे आमदार देवेंद्र कोठे यांनी कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला :- दिलीप कोल्हे { जुने लक्ष्मी विष्णू कामगार चाळ चेअरमन तथा माजी उपमहापौर}….

वास्तव्यास असलेल्या जागेपेक्षा दोनशे स्क्वेअर फुट अधिक जागा बांधकाम करून कामगारांना मोफत देणार :- माजी उपमहापौर दिलीप कोल्हे{ लक्ष्मी विष्णू चाळ चेअरमन }

 

सोलापूर

लक्ष्मी विष्णू चाळ कामगार चाळीचा बी टू चा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता हा प्रश्न लवकर मार्गी लावू असे अभिवचन आमदार देवेंद्र कोठे यांनी कामगारांना दिले होते.त्यानुसार आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्तरावरून बी टू चा प्रश्न मार्गी लावला . आमदार देवेंद्र कोठे यांनी कामगारांच्या चाळीचा प्रश्न मार्गी लावल्याने लक्ष्मी विष्णू कामगार चाळीचे चेअरमन माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी महसूल , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार देवेंद्र कोठे यांचे विशेष आभार प्रकट केले .

 

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले” या म्हणीप्रमाणे आमदार देवेंद्र कोठे यांनी शब्द खरा करून दाखवलाच अशी प्रतिक्रिया जुनी लक्ष्मी विष्णू कामगार चाळीचे चेअरमन माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना दिलीप कोल्हे म्हणाले की, या निर्णयामुळे कामगारांमध्ये आता आनंदाचे वातावरण असून येणाऱ्या काळात आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्याला मुंबईत घेऊन जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत महत्त्वाची बैठक लावणार असल्याचं सांगितल. वंचित घटकातील कामगारांना त्यांच्या सद्यस्थितीतील वास्तव्यास असलेल्या जागेपेक्षा अधिक जागा बांधकाम करून मोफत देणार असल्याचेही कोल्हे यावेळी म्हणाले…

 

आमदार देवेंद्र कोठे यांचे फोनवरून आभार प्रकट करताना माजी उप महापौर दिलीप कोल्हे 

या निर्णयामुळे कामगारांना आता खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना सोलापूरकरांमधून व्यक्त केले जात आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button