बार्शी मध्ये भरदिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिस उप निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने घेतलं ताब्यात….
चोरट्यांकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाऱ्यास अटक....

दिनांक 6/04/2023 रोजी 13:30 वा. ते 16:00 वा. च्या सुमारास सुभाष नगर बार्शी शहर येथील फिर्यादी राजकुमार काशिनाथ मांगलकर यांचे राहते घरी अज्ञात चोरटयांनी घरफोडी चोरी केल्याने *बार्शी शहर पोलीस ठाणे गुरनं 258/2023 भादविसंक 454, 380, 201, 413, 34, 75 प्रमाणे दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.*
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकाने घटनास्थळी भेट देवून घटनास्थळावरील सी.सी.टी.व्हि फुटेज व इतर गोष्टींची पहाणी करुन सदरचा गुन्हा हा मध्यप्रदेश येथील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार यांनी सदरचा गुन्हा केला असल्याबाबत खात्री झाली.
पोलिस उप निरीक्षक शैलेश खेडकर
सदर गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना मध्यप्रदेश येथून अटक करुन त्यांचेकडून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आले होते. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण चे तात्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील सफौ/ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, प्रकाश कारटकर, अक्षय डोंगरे, अक्षय दळवी, अनिस शेख, धनराज गायकवाड व चालक समीर शेख सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी करुन गुन्हयातील मुद्देमाल व तांत्रिक पुरावा सी.सी.टी.व्ही फुटेज इत्यादी हस्तगत करुन आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
सदर गुन्हयातील आरोपी यांना दिनांक 19/04/2023 रोजी अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून सर्व आरोपी हे अदयापर्यंत न्यायालयीन कोठडीतच (जेल मध्ये ) होते.
दोषसिध्द आरोपींची नांवे –
1) पवन उर्फ भुरा रामदास आर्य, वय 38 वर्षे, – 07 वर्षे कारावास व 2000 रु. दंङ
2) मनोजकुमार ठाकूरदास आर्य, वय 32 वर्षे – 05 वर्षे कारावास व 2000 रु. दंङ
3) देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर वय 37 वर्षे, – 05 वर्षे कारावास व 2000 रु. दंङ
4) दिपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोर, वय 41 वर्षे -(सोनार) 07 वर्षे कारावास व
5000 रु. दंङ सर्व रा. इंदौर मध्यप्रदेश.
सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक 04 हा दिपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोर हा इंदौर सराफ बाजारातील व्यावसायिक सोनार असून त्याने वेळोवेळी आरोपींकडून चोरीचे सोने घेवून ते सोने वितळून त्याचा रवा (लगड) बनवून स्थानिक दलालामार्फत कमिशन घेवून चोरीचे सोने विकत असल्याचे निषप्पन्न झाले. त्यामुळे सोनाराला पुरावा नष्ट करुन त्याचे स्वरुप बदलणे करीता 07 वर्षे कारावास व 5000 रु. दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जालिंदर नालकुल बार्शी उपविभाग बार्शी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, बार्शी शहर पोलीस ठाणे, तात्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील सफौ/ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, प्रकाश कारटकर, अक्षय डोंगरे, अक्षय दळवी, अनिस शेख, धनराजय गायकवाड व चालक समीर शेख सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, अमोल माने बार्शी शहर पोलीस ठाणे व सरकारी अभियोक्ता दिनेश देशमुख साहेब, कोर्ट पैरवी पोसई संजय कपडेकर व पोकॉ / गणेश ताकभाते, चौधरी यांनी बजावली.
—— 0000 —–