crimemaharashtrapoliticalsocialsolapur

शहर गुन्हे शाखेकडून गुटख्याच्या कारवाईत एकूणच ६,७९, ६२० रु .किमतीचा मुद्देमाल हस्तगत….

पंजाब तालमीत राहणाऱ्या साजिद कय्युम नदाफ ला गुन्हे शाखेने घेतले ताब्यात...

दिनांक १९/०५/२०२५ रोजी, शहर गुन्हे शाखेकडील, पो.स.ई./मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयु आयुक्तालय हद्दित गस्त करीत असताना, अमर ज्योती नगर, मुळेगांव रोड सोलापूर येथे अवैधरीत्या गुटखा व सुगंधी तंबाखु साठवुन ठेवले असल्याची गोपनिय माहिती प्राप्ती झाली होती. त्याअनुषंगाने, सदर ठिकाणी पोसई/मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना बोलावून, सदर ठिकाणी छापा टाकुन, इसम नामे साजिद कय्युम नदाफ, वय २४ वर्षे, रा.घ.नं.३४८, उत्तर कसबा, पंजाब तालीम जवळ, सोलापूर याने, पत्र्याचे शेडमध्ये साठवुन ठेवलेला RMD पान मसाला, M सुगंधी तंबाखु, विमल पान मसाला, V-१ सुगंधी तंबाखु व विना लेबल सुगंधी तंबाखु, असा एकुण ६,७९,६२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

त्यानुसार, इसम नामे साजिद कय्युम नदाफ याचेविरूध्द, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं.४४४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i), २६ (२) (ii) २६(२) (iv) २७(३) (E), ३० (२) (A), ५९ अन्वये, गुन्हा नोंद करणेत आला आहे.

 

 

ही कामगिरी, मा. अजित बोन्हाडे, प्रभारी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पो.स.ई/मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार-नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, संजय साळुंखे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button