maharashtrapoliticalsocialsolapur

अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : दोन साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष ,…..

.
सोलापूर

दिनांक- ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाला.

यात हकीकत अशी की, दिनांक 8-6-2019 रोजी यातील मयत अँड राजेश कांबळे हा सकाळी अकरा वाजेचे सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्याच्या पत्नीस सांगून त्याच्या घरातून मोटरसायकलवर निघून गेला होता.
त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश याने मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले .त्यानंतर त्याची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता. रात्री शोधा शोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही. त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात, पाय,धड व मुंडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले. त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले वरील तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.

*खटल्याच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदार नितीन मच्छिंद्र कांबळे याने आपल्या साक्षीत दिनांकj 25/06/2019 रोजी यातील आरोपी सुरेश चव्हाण याने दुसरा पंच भारत गुणापुरे व एसीपी सकळे साहेब यांच्या समोर स्वतःहून निवेदन दिले की मयत राजेश कांबळे याचा खून करून त्याच्या वाट्यास आलेले दोन सोन्याच्या चैन काढून देतो चला असे म्हणून निवेदन दिले त्याप्रमाणे त्याने त्याच्या घरात असलेल्या कपाटातून दोन सोन्याच्या चैन काढून दिल्या व त्या चैन वर एन आर डी असा ठसा होता. त्या चैन जप्त करून पोलिसांसमक्ष पंचनामा केला. अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली.*

*आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदाराने नकारात्मक उत्तरे दिली.*

*दुसरा साक्षीदार सागर मदन गागडे यांनी आपल्या साक्षीत दिनांक 12. 6.2019 रोजी त्यास बंटी खरटमल रहात असलेल्या घराजवळ घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी बोलावले होते त्याप्रमाणे घटनास्थळावर दोन काळे रंगाचे प्लास्टिकचे पोते दिसून आले त्यामध्ये एका पोत्यात दोन हात,दोन पाय व मुंडके असे होते तर दुसऱ्या पोत्यात हात पाय व मुंडके नसलेले धड होते. त्या ठिकाणाहून लोखंङी हातोडा, कोयता व सत्तुर अशा एकूण 26 चीज वस्तू घटनास्थळावरून जप्त करण्यात आले. त्या ठिकाणी बोटांचे ठसे हे मिळून आले. पंचनाम्याचे चित्रकरण देखील करण्यात आले होते . अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.*

सदर साक्षीदाराचा उलट तपास हा पूर्ण न झाल्याने उलट तपासासाठी व खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी 20/05/2025 ही तारीख नेमण्यात आली.

*या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1तर्फे अँड राजेंद्र फताटे आरोपी नंबर 2 तर्फे अँड नागराज शिंदे आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदीप माने हे काम पाहत आहेत.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button