एस. टी. कर्मचाऱ्यांचे आजपासून विविध हक्काच्या मागण्यासाठी धरणे आंदोलनाला सुरुवात वाहतूक विस्कळीत राज्य परिवहन महामंडळाच्या दैनंदिन चलनाला मोठा फटका …
१३ युनियन ८० हजार कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन..

सोलापूर
आज पासून राज्यात एस. टी. कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकूण १३ युनियन चे ८० हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.यामध्ये संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स {काँग्रेस},
महाराष्ट्र एसटी कामगार सेना, रिपब्लिकन राज्य परिवहन राज्य कर्मचारी संघटना, कास्ट्राईब एसटी संघटना, महाराष्ट्र एसटी काँग्रेस, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, सेवाशक्ती राज्य परिवहन कामगार संघटना, बहुजन राज्य परिवहन कामगार संघटना या संघटनांचा समावेश आहे. या बेमुदत संपामुळे वाहतूक विस्कळीत होणारा असून दैनंदिन चलनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होणार असून राज्य शासनाला ही याचा फटका बसणार आहे.
या कामगार संघटनांच्या आंदोलनाला सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार , राजन जाधव यांनी पाठिंबा दर्शवला आहे. माऊली पवार यांनी या कर्मचाऱ्यांमुळे सत्तेत असलेले सदाभाऊ खोत यांना फोन लावला असता खोत यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही . त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्यावर एस. टी.कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांकडून व माऊली पवार यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
या कामगार संघटनांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? चला पाहू…!
- १) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांना वेतन देण्यात यावे
२) महागाई भत्त्याची माहे जुलै 2018 ते 2024 या कालावधीची थकबाकी अद्याप राज्य परिवहन कामगारांना मिळाले नाही ती थकबाकी कामगारांना त्वरित मिळावी
३) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरबाडी भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर राज्य परिवहन कामगारांना लागू करण्याची कामगार करारात तरतूद असतानाही त्यामध्ये प्रशासना ने घरवाढीभत्त्याचा दर ८,१६,२४ टक्क्याऐवजी ७,१४,२१ व वार्षिक वेतन वाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी करून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग केलेला आहे. याबाबत राज्य परिवहन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने घरबाडे भत्त्याचा दर शासकीय दरानुसार ८,१६ ,२४ माहे ऑक्टोबर २०२१ पासून व वार्षिक वेतनवाडीचा दर ३ टक्के माही नोव्हेंबर २०२१ पासून राज्य परिवहन कामगारांना लागू केला आहे. परंतु माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीची वार्षिक वेतन वाढीची व घरभाडे भत्त्याची थकबाकी राज्य परिवहन कामगारांना अद्याप मिळालेले नाही ती त्वरित देण्यात यावी.
यासह विविध मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. सोलापुरात राज्य परिवहन कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारा बाहेर राज्य परिवहन कामगार कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करतात. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन चालूच राहील असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
एसटी कामगारांना न्याय मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा इशारा माऊली पवार यांनी दिला आहे.
या आंदोलना प्रसंगी प्रशांत गायकवाड शशिकांत झुंजार बाळासाहेब बिडकर बाळासाहेब मोरे विशाल भंडारे सुनील गायकवाड ज्ञानेश्वर लामकाने संतोष जोशी हेमंत साठे सदाशिव अंभोरे प्रसाद कुंभारे सुनील शिंदकर सोमनाथ पाटील महावीर नळे शहाजी घोडके यांच्यासह इतर एस. टी .कामगार कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती….