maharashtraindia- worldpoliticalsocialsolapur

_सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विविध ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन

महाशिवरात्री विशेष ग्रंथांना सोलापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

 

 

.

 

सोलापूर –

 

 

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर शहरात विविध ठिकाणी सात्विक उत्पादने व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अक्कलकोट रस्त्यावरील विरतपस्वी प्रशाला, कन्ना चौकातील श्री. रेवणसिद्धेश्वर मंदिर, चौपाड येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे हे प्रदर्शन लावण्यात आले होते.

महाशिवरात्री निमित्त मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सात्विक उत्पादने उपलब्ध व्हावी तसेच राष्ट्र, धर्म यांसारख्या विषयावरील ग्रंथाचा लाभ व्हावा या उद्देशाने हे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला शहरातील अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सोलापूर जिल्ह्यात एकूण १६ ठिकाणी असे प्रदर्शन लावण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन

या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्रीमल्लिकार्जुन मंदिर येथे आमदार श्री. विजयकुमार देशमुख आणि महापौर  विनायक कोंड्याल यांच्या हस्ते तर श्रीरेवणसिद्धेश्वर मंदिर येथे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या ठिकाणी धर्मशिक्षण, बालसंस्कार, साधना, हिंदुत्व, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण इत्यादी विषयांचे ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच सात्विक जीवनशैली यांविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ व उत्पादने ठेवण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी भाविकांना मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button