महाशिवरात्री निमित्त श्री नवदुर्गा माता मंदिरात भव्य दीपोत्सव; ३० किलो रांगोळीने साकारली श्री मल्लिकार्जुन सिद्धेश्वर महाराजांची आकर्षक प्रतिमा

सोलापूर (प्रतिनिधी) –
जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने 🚩 श्री नवदुर्गा माता मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक वातावरण, मंत्रोच्चार आणि दीपप्रज्वलनाने परिसर भक्तिमय झाला होता.
या विशेष निमित्ताने मंडळाच्या वतीने श्री मल्लिकार्जुन सिद्धेश्वर महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली. तसेच भगवान महादेवांचे शिवलिंगही रांगोळीच्या स्वरूपात रेखाटण्यात आले. या आकर्षक रांगोळीसाठी सुमारे ३० किलो रांगोळी व १५ किलो फुलांचा वापर करण्यात आला. रंग, फुलांची सजावट आणि कलात्मक मांडणीमुळे मंदिर परिसर भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

ही सुंदर रांगोळी समर्थ लोखंडे, आरती पदमगोंडा, आरती पिसे व ऋतुजा वाघमोडे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने साकारली. त्यांच्या कलाकृतीचे उपस्थित भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सिद्धेश्वर नाडार, संजय होमकर, भीमाशंकर पदमगोंडा, शेखर सुरवसे, नारायण सुरवसे, बाळासाहेब वाघमोडे, बाळासाहेब होमकर, नागेश व्होड्राव, जगदीश व्होड्राव, चंद्रकांत कलशेट्टी, आप्पासाहेब पटणे, राजेश हवले, गणेश पांढरे, मनोज पाटील, गजानन खटके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर अतनूरे, गुरुराज पदमगोंडा, सूरज होमकर, ऋतुराज वाघमोडे, वरद होमकर, विवेक गावडे, मल्लिकार्जुन करजगी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
महाशिवरात्री निमित्त आयोजित या दीपोत्सवामुळे मंदिर परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने उजळून निघाला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले व महादेवाच्या नामस्मरणात सहभागी होत धार्मिक एकात्मतेचा अनुभव घेतला.




