BIG Breaking :- स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी ३ गावठी पिस्तूल व १९ जिवंत काडतुसे गुन्ह्यातील आरोपींकडून हस्तगत …
मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

सोलापूर
गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी , इसम नाव फाईक मुस्ताक हा जंगलगी गावात राजकुमार बिराजदार यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व राउंड सोबत बाळगुन आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळालेली बातमी सांगितली असता, त्यांनी तात्काळ पथकासह रवाना होवुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर तात्काळ मंगळवेढा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण कडील दैनंदिनी क्रं नोंद क्र 21/2025 अन्वये छापा कारवाई पथक रवाना झाले. त्यानंतर पोलिसांनी गराडा घालून बातमीतील नमूद वर्णना प्रमाणे इसम राजकुमार बिराजदार यांच्या शेतात दोन इसम मिळुन आले, त्यांच्या हालचालीवरून बातमी प्रमाणे संशय आल्याने त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे फाईक मुस्ताक कळमबैंकर वय, 46, रा. शिवाजी नगर, मिस्वी विला, मिल्लत नगर, रत्नागिरी असे असल्याचे सांगितले त्याचे सोबत असलेल्या इसमास त्याचे नाव, गाव पत्ता विचारले असता निगोंडा हणमंत बिराजदार वय. 37, रा. जंगलगी ता. मंगळवेढा जि. सोलापुर यांची अंगझडती घेतली असता, फाईक मुस्ताक कळमबैंकर च्या कंबरेला डाव्या बाजूस पॅन्टीत खोचलेली एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह व पॅन्टच्या उजव्या खिशातून 05 जिवंत काडतुसे व पॅन्टच्या डाव्या खिशामध्ये मोबाईल हॅन्डसेट मिळून आला.
त्यानंतर त्यास शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का ? याबाबत विचारले असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. देशी बनावटीचे पिस्टल हे मला निगोंडा बिराजदार यांने दिले असल्याचे सागिंतल्याने निगोंडा याच्याकडे अधिक चौकशी केली असता मी चार देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे उपलब्ध करून त्यापैकी 01 पिस्टल व 05 जिवंत काडतुसे कळंबा जेल मध्ये असताना ओळख झालेला मित्र फाईक कळमबैकर यास दिले व त्याची राहण्याची व्यवस्था राजकुमार बिराजदार यांच्या शेतात केली व उर्वरीत 03 देशी बनावटीचे पिस्टल व 18 जिवंत काडतुसे आम्ही राहत असलेल्या राजकुमार बिराजदार यांच्या असल्याचे सांगितले .
फाईक कळमर्बेकर याच्या ताब्यात असलेले देशी बनावटीचे 01 पिस्टल 05 जिवंत काडतुसे मॅगझीनसह व मोबाईल, इत्यादी वस्तू मिळून आल्याने पोलिसांनी .हस्तगत केले .
तसेच नाव निगोंडा बिराजदार याने ठेवलेले 3 देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे हे इसम नाव निगोंडा बिराजदार यांनी त्यांचा भाऊ राजकुमार बिराजदार यांच्या घरात ठेवले असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी निगोंडा बिराजदार यांच्या राहत्या घरातून एक लाल व निळ्या रंगाची पिशवी काढून दिली असता ती पिशवी पंचा समक्ष उघडुन पाहिली असता त्यामध्ये 3 गावठी पिस्टल व पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत एकूण 19 जिवंत काडतूस मिळून आले .3 गावठी पिस्टल व 19 जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी वरील इसमांच्या घराची झाडा – झडती घेतली असता वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पाउच मध्ये सिलबंद करून त्या सोबत असलेले 19 जिवंत काडतुसे प्लास्टिक बॉक्स मध्ये सिल करण्यात आले.
दिनांक 5/02/2025 रोजी बुधवारी आरोपी नाव फाईक मुस्ताक कळमबैकर वय ४६ रा.शिवाजी नगर मिस्त्री विला,मिल्लत नगर रत्नागिरी , निगोंडा हणमंत बिराजदार वय ३७ व राजकुमार हणमंत बिराजदार दोघे ही राहणार जंगलगी तालुका मंगळवेढा यांनी कोणत्याही प्रकारच्या अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना बेकायदेशीर पणे जवळ बाळगल्या प्रकरणी त्यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कृष्णाराव हे करीत आहेत ..