crimemaharashtrapoliticalsocialsolapur

ब्रेकिंग:- तस्करी करिता सोलापूर येथुन आंतरराज्य टोळीने चोरलेली स्कॉर्पिआ राजस्थान बॉर्डर येथून जप्त…

विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील DB पथकाची कामगिरी...

विजापूर नाका पोलीस स्टेशन गु.र.न. १३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) मधील फिर्यादी नाव आण्णाराव म्हेत्रे रा. घर नं. १२ संत तुकाराम नगर, विजापूर रोड, सोलापूर यांचे घरासमोरून दि. १६/०१/२०२५ रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी चोरी गेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास शितलकुमार गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत असुन दाखल गुन्हा उघडकीस आणणेकरीता मा. पोलीस आयुक्त साो, सोलापूर शहर व मा. पोलीस उप-आयुक्त साो (परिमंडळ), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग २ सोलापूर शहर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड साो, यांनी गुन्हा उघडकिस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/शितलकुमार गायकवाड यांना सुचना दिलेल्या होत्या.

 

त्यानुसार विजापुर नाका पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस स्टाफ असे सदर गुन्हयाचा तपासा दरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे १३५ सी.सी.टी.व्ही. फुटेज व १२ ठिकाणचे डम्प डाटा काढुन त्याचे तांत्रिक विश्लेषन करून राजस्थान येथुन आरोपी क्र. १ रमेशकुमार प्रभुराम बिश्नोई वय २५ वर्षे, रा. घर नं. १६४ मासोई की ढाणि सिया ता. सांचौर, जिल्हा -जालौर, राज्य राजस्थान आरोपी क्र. २ रूपाराम मनाराम बिश्नोई वय ३२ वर्षे, रा. पुनासा, ता. भिनमाल जिल्हा जालौर, राज्य राजस्थान यांना अटक करून सदर गुन्ह्यात फिर्यादीची चोरीस गेलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी जप्त केली आहे तसेच गुन्ह्याचे तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदाई कंपनी क्रेटा GJ09BK1123 जप्त केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त  एम. राजकुमार साो, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) श्री विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त वि२ श्री यशवंत गवारी साो, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दादा गायकवाड सो, पोनि श्रीमती संगिता पाटील साो (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/शितलकुमार गायकवाड, पोहेकॉ/सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोकॉ/ अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, हरीकृष्ण चोरमुले व मोबाईल तांत्रिक विश्लेषक/अयाज बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button