Speed news:- विनोदवीर प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई, ११ जणांविरोधात गुन्हा…

सोलापूर
मराठमोळा विनोदवीर प्रणित मोरेला मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणित मोरेचा सोलापूर पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलिस ठाण्यामध्ये तन्वीर शेख आणि अन्य १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्या १० जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५, १९१, १८९ आणि १९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहारिया या अभिनेत्यावर प्रणित मोरेने विनोद केला होता. त्यावरून त्याला मारहाण करण्यात आली होती.
वीर पहारिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. प्रणित मोरेने वीर पहारियावर सोलापूरमधील एका स्टॅडअप कॉमेडी शोदरम्यान विनोद केल्यामुळे संतप्त झालेल्या वीरच्या चाहत्यांनी त्याला मारहाण केली होती. वीर पहारियाला ही घटना समजताच त्याने तात्काळ इन्स्टाग्राम पोस्ट लिहून खंत व्यक्त केली होती.