“तू मला आवडतेस मला सोडून जाऊ नकोस” हरिभाई देवकरण महाविद्यालयातील शिक्षकाचा प्रताप शिक्षण घेत असलेल्या पिडितेवर केला अत्याचार गुन्हा दाखल…
पीडितेच्या तक्रारी नंतर संस्था चालकांनी शिक्षकास केले संस्थेतून निलंबित ...

सोलापूर
यात थोडक्यात हकीकत अशी की यातील पीडित तक्रारदार हिने दिलेल्या फिर्यादी नुसार हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात पीडिता ही सध्या शिक्षण घेत असून याच महाविद्यालयातील शिक्षक आरोपी नाव यलप्पा उर्फ सुमित अनंत गाडेकर रा.सोलापूर हे सातत्याने पीडितेचा पाठलाग करणे , नाहक त्रास देत होते . पीडितेला *”तू मला आवडतेस”* असे सारखे म्हणून रस्ता अडवत होता . पिडीतेची इच्छा नसताना ही आरोपी यलप्पा उर्फ सुमित अनंत गाडेकर याने फिर्यदीचा हात धरून जबर दस्तीने त्याच्या सोबत घेऊन जाऊन फिर्यादी शी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला . व पिडीतेवर अत्याचार केला .एवढ्यावरच न थांबता *”तू मला आवडतेस तू मला सोडून जाऊ नकोस “* नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत होता . छोट्या छोट्या किरकोळ कारणावरून मानसिक छळ करत होता या गोष्टीला कंटाळून पिडीतेने सदर बझार पोलीस ठाण्यात शिक्षका विरुद्ध फिर्याद दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षका विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात बाल लैंगिक शोषण सह भारतीय न्याय संहिता कलम ७४,७८ ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्हट्टे करीत आहेत….