maharashtrapoliticalsocialsolapur

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी CA सुशील बंदपट्टे यांची निवड…

 

सोलापूर : सोलापुरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली. सी ए सुशील बंदपट्टे यांच्या निवडीनंतर महामंडळाच्यावतीने बंदपट्टे यांचा सत्कार करण्यात आला.

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या यंदाच्या वर्षीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी सी ए सुशील बंदपट्टे यांची एकमताने निवड करण्यात आली. सन 2025-2026 च्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाची सर्वसाधारण बैठक आज सायंकाळी डाळिंब आड मैदान, इंदिरा कन्या प्रशाला , हुतात्मा जगन्नाथ शिंदे चौक येथे पार पडली..

ही सभा मावळते अध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जेष्ट ट्रस्टी सदस्य शिवाजी राव घाडगे (गुरुजी), ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर (नाना)काळे, ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत (बापू) डांगे , ट्रस्टी सेक्रेटरी प्रीतम परदेशी, ट्रस्टी खजिनदार अंबादास शेळके, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, ट्रस्टी सदस्य राजन जाधव, महादेव गवळी , विनोद भोसले, अनिकेत पिसे, भाऊसाहेब रोडगे, ,बजरंग जाधव, प्रकाश ननवरे , विवेक फुटाणे उपस्थित होते या शिवाय महामंडळाचे प्रमुख सदस्य राजाभाऊ काकडे, मातीन बागवान, प्रतापसिंह चव्हाण, सुनील शेळके, विजय पुकाळे, लहू गायकवाड, जितू वाडेकर, संजय पारवे, उज्ज्वल दीक्षित, लताताई फुटाणे, निर्मलाताई शेळवणे, शत्रुघ्न माने, अनिल म्हस्के, सदाशिव पवार, भ्रम्हदेव पवार, गणेश डोंगरे, जीवन यादव, संजय जाधव, कल्याण घवाणे, लिंभाजी जाधव, धर्माजी भोसले, गोवर्धन गुंड, मोहन खमीतकर, मनीषा नलावडे, अंबादास सपकाळ, लक्ष्मण महाडीक, अमोल व्यावहारे, राजू हुंडेकरी, बाबासाहेब जाधव, चंद्रकांत पवार, आबा सावंत, अशोक कलशेट्टी, तात्या वाघमोडे, बाबू बनसोडे, रमेश जाधव, संदीप साळुंखे, सचिन शिंदे, चंद्रशेखर सुरवसे, सचिन चव्हान यांच्यासह शिवभक्त मोठ्या प्रमाणात हजर होते.

याप्रसंगी सुरुवातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर यंदाच्यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी रात्री पाळणा सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन यावेळी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केले.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे निवडण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे –

अध्यक्ष सी.ए.सुशील बंदपट्टे , कार्याध्यक्ष पंकज काटकर, सचिव महेश हनमे, उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, अमोल काळंब जॉन मुनाळे, उपाध्यक्ष महिला लताताई ढेरे, सुनंदाताई साळुंखे, सहसेक्रेटर विश्वनाथ गायकवाड, खजिनदार मारुती सावंत, सहखजिनदार विवेक इंगळे, मिरवणूक प्रमुख आदित्य घाडगे, उपमिरवणूक सोमनाथ मस्के, कुस्ती प्रमुख बापू जाधव, प्रसिद्धि प्रमुख बस्सु कोळी संदीप वाडेकर, कार्यालय प्रमुख प्रमुख देविदास धुळे, सचिन स्वामी, तुषार गायकवाड, कुष्णा भुरळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button