BIG BREKING:- सोलापुरात तीन बांगलादेशी तरुणांची घुसखोरी …

सोलापूर
.
सोलापूरच्या चिंचोली एम आय डी सी तील राठी टेक्सस्टाईल कंपनीत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात विनापरवाना बांगलादेशी तरुण राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.मोहोळ पोलिसांनी एटीएसच्या मदतीने ही कारवाई केलीय.
या बांगलादेशी तरुणांकडे भारतात राहण्यासाठी लागणाऱ्या पासपोर्ट, व्हिजा आदी कागदपत्राची चौकशी केली असता त्यांच्याकडे अशी कोणतीच कागदपत्रे आढळून आली नाहीत.
चंचल विष्णुदेव उर्फ विश्वनाथ रॉय उर्फ पहन, हुजूरअली हुसेन आणि मीनल शनिचेरा टुडू राहणार कटला जिल्हा दिनासपुर, बांग्लादेश असे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी तरुणांची नावे आहेत.
या बांगलादेशी तरुणांवर भारतीय पारपत्र अधिनियम 1950 चे कलम 3(a), 6(a) सह परकीय नागरिक कायदा कलम 3(1), 14 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.