ब्रेकिंग:- 31st च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध ढाबे, चायनिज गाड्या, हॉटेल्सवर व वाहतुकीवर करडी नजर …

नाताळ, ३१ डिसेंबर, व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर अवैध ढाबे, चायनिज गाड्या व हॉटेल्सवर कारवाई करण्याकरीता मा. श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली नाताळ, ३१ डिसेंबर, व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर ढाबे, चायनिज गाड्या व हॉटेल्स, क्लब रिसॉर्ट मध्ये कारवाई करण्याकरीता सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये विशेष पथके नेमण्यात् आलेली आहेत. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठीकाणी ढाबे, चायनिज गाड्या व हॉटेल्स, क्लब रिसॉर्ट मध्ये पार्टीचे आयोजन केले जात असते अशा प्रकारच्या ढाबे, चायनिज गाड्या व हॉटेल्स, क्लब रिसॉर्ट मध्ये बनावट व परराज्यातील मद्याची अनाधिकृत विक्री केली जाते जी मानवी शरीराला अपायकारक असते. अशा प्रकारच्या मद्य पिणा-या ग्राहक व मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपिणा- या ग्राहकांनी मद्य अधिकृत वाईन शॉप/ शासनमान्य देशी दारू दुकानातुनच मद्य खरेदी करावे व अधिकृत परमिटरुम व बिअर बार मध्ये मद्य सेवन करावे.
तसेच राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडुन सहा पथके नेमण्यात आलेली असुन या पथका मध्ये एक निरीक्षक, तीन दुय्यम निरीक्षक आणि कर्मचारी यांचे पथक राहणार आहे. या पथकाकडुन अवैध ढाबे, चायनिज गाड्या व हॉटेल्स, क्लब रिसॉर्ट मध्ये बसुन मद्य पिणा-या मद्यर्षीवर व मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतुकीवर लक्ष- नाताळ, ३१ डिसेंबर, व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर बनावट व परराज्यातील अवैध मद्य आणले जाते अशा प्रकारच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष पथकाचे लक्ष राहणार आहे.
एक दिवसीय परवाना- नाताळ, ३१ डिसेंबर, व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर हॉटेल, रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात येणा-या पार्ध्यामध्ये मद्य सेवनाकरीता आवश्यक असणारा एक दिवसीय विशेष परवाना ,
एफ़ एल- IV A) राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडुन तात्काळ देण्याची सोय उपल्ब्ध आहे. ज्या हॉटेल व रिसॉर्टधारकांना पार्टीमध्ये मद्य ठेवण्यात येणार आहे अशा हॉटेल्स व रिसॉर्धारकांनी एक दिवसाचा परवाना अर्ज करुन घ्यावा त्या करीता याविभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन १) प्रतावित जागेचा उतारा ७/१२ ८अ चा उतारा २) बांधकाम परवाना/वापर परवाना ३) प्रस्तावित जागेचा नकाशा ४) जागा मालकाचे आधारकार्ड इतर आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर एक दिवसीय परवाना देण्यात येईल. तसेच नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभुमीवर दि. ३१/१२/२०२४ ते दुस-या दिवशी पहाटेपर्यंत वाईन शॉप (एफ एल-२), बिअर शॉपी (एफ एल बी आर-२) अनुज्ञाप्ती पहाटे १.०० वाजेपर्यंत व परमिटरुम व बिअर बार (एफ एल-३) व क्लब अनुज्ञाप्ती (एफ एल-४) या पहाटे ५.०० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
मागील आठवड्यात सोलापूर – तुळजापूर रोडवरील हॉटेल अपुर्वा ढाबा येथे कारवाई करण्यात आली असुन त्यामध्ये ढाबा चालकास रु.२५,०००/- व चार मद्यपींना प्रत्येकी रु.३०००/- इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध विनापरवाना महीन्यात मद्य पिण्यास परवानगी देणा-या सात ढाब्यांवरती कारवाई करुन सात ढाबा मालक व मद्यपी ग्राहकांना मा. न्यायालायासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रुपये २५०००/- व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये ३०००/- ईतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असुन एकुण रु.२,४१,५००/-इतका दंड मा. न्यायालयात जमा करण्यात आला आहे. तसेच ढाबे, चायनिज गाड्या व हॉटेल्स, क्लब, रिसॉर्टमध्ये विना परवाना ग्राहकांना मद्य पुरवठा करणे व मद्य सेवनास परवानगी दील्यास मालकास महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (क) (ख) अन्वये तीन ते पाच वर्षापर्यंत करावासाची शिक्षा किंवा रु.२५,०००/- ते ५०,०००/- इतका दंड किंवा दोन्ही हौऊ शकते. तसेच मद्यपी ग्राहकांना कलम ८४ अन्वये रु.५००/- ते ५०००/- इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारची अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढे अशीच चालू राहणार आहे.
अवैध मद्यविक्री. अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.