crimemaharashtrapoliticalsocialsolapur

पैशाच्या कारणावरून खून: आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर… ॲड. जयदीप माने

सोलापूर
पैशाच्या कारणावरून चंद्रकांत पवार याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर याची मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.
या प्रकरणाची हकीकत अशी की, आरोपी अतुल मोटेकर याचे घरी पत्रे ठोकण्याचे केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपी अतुल मुटेकर व चंद्रकांत पवार याच्या मध्ये भांडण झाले होते. त्यामुळे चिडून जाऊन आरोपी अतुल मुटेकर याने दि. १९.०६.२०२३ रोजी बेंबळे ते अकोले बुद्रुक जाणारे रोडवर चंद्रकांत बाबा पवार, रा. कोन्हापुरी ता. पंढरपूर याचा डोक्यात दगडाने मारून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पवार यांचे प्रेत उसाचे शेतीचे बांधालगत खड्ड्यात टाकून दिले होते, या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर यास टेंभुर्णी पोलिसांनी अटक केलेली होती.
आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता.

 

 

 

त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की, दोषारोपत्रात आरोपीविरुद्ध सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वासार्ह नाही असा युक्तिवाद केला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केला.
याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. पी.पी. देवकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia