crimemaharashtrapoliticalsocialsolapur
Speed News:-सोलापुरात युवकाची हत्या दोघांवर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

सोलापूर
यात थोडक्यात हकीकत अशी की यातील मयत आरोपी वय युवराज प्रभुलिंग स्वामी वय वर्षे १७ रा. शिवगंगा नगर शेळगी सोलापूर हा एक रिक्षा चालक आहे.रविवारी सकाळच्या सत्रात किरकोळ कारणातून मद्यपी धुंदीत मागील भांडणाचा राग मनात धरून मयताच्या इतर मित्रांनी मिळून लोखंडी रॉड डोक्यात घालून निर्घृण खून केला.ही घटना शहरातील मित्र नगर दहिटने परिसरात घडली .या घटनेनं शेळगी परिसरात एकच खळबळ उडाली.या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विजय उर्फ सोनू बनसोडे , सुजल मरबे अशी गुन्हा दाखल करण्याचे आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेतील आरोपींवर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ नागेश स्वामी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास महिला दुय्यम पोलीस निरीक्षक शेख हे करीत आहेत….