crimemaharashtrapoliticalsocialsolapur

सुनेचा गोळ्या देऊन गर्भपात केलेप्रकरणीच्या गुन्ह्यात सासू व सासरे यांना अटकपूर्व जामीन….

 

सोलापूर:

 

फिर्यादीचा गोळ्या देऊन गर्भपात केलेप्रकरणीच्या गुन्ह्यात मामे सासू व सासरे अल्ताफ कुमठे, तसमिम कुमठे, शहानवाज शेख रा. सोलापूर यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

याची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादीस लग्नानंतर शारीरिक व मानसिक त्रास दिला, नोकरीसाठी 10 लाख रुपये मागितले आणि गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात केले प्रकरणी फिर्यादीच्या सासरकडील लोकांनविरोधात विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

 

 

 

 

त्यामुळे आरोपींच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आरोपी अल्ताफ कुमठे, तसमिम कुमठे आणि शहानवज शेख यांनी अॅड. देवदत्त बोरगावकर यांच्यामार्फत सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्जास सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. तसेच फिर्यादीने देखील जामीन अर्जला विरोध करणारे प्रतिन्यापत्र दाखल केले होते .

 

 

 

 

 

त्यावर आरोपीचे वकिलांनी युक्तीवाद करताना असा मुद्दा मांडला की, फिर्यादीच्या गर्भपाताशी आरोपी हे मामे सासू व सासरे आहेत त्यांचा प्रकारणांशी कोणताही संबंध नाही, आरोपी हे त्या ठिकाणी राहणेस सुद्धा नाही, त्यामुळे कधी त्रास देण्याचा प्रश्नच नाही असा युक्तिवाद केला. तसेच युक्तिवादच्या अनुषंगाने काही महत्वाची कागदपत्रे दाखल केली. सदरची सर्व परिस्थिती, कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने शिक्षक मामे सासू व सासरे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 

या प्रकरणात आरोपीतर्फे , अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड. निकिता कुलकर्णी अॅड.शिवानी करवा तर सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार व मूळ फिर्यादीतर्फे अॅड इनामदार यांनी काम पाहिले.

क्रि.बेल. अर्ज क्र. 234/2026

कोर्ट.
मा. जिल्हा व अति.सत्र न्यायाधीश श्री.एस. वि.केंद्रे साहेब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa